आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आबलोली : एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलचे स्पर्धा परीक्षांमध्ये उज्ज्वल यश

आबळोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेने स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

इयत्ता पहिलीतील विद्यार्थी कु. तेज तेजस केंबळे याने 150 पैकी 134 गुण मिळवत मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत कोकण विभागीय यादीत चौथा क्रमांक तर राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत नववा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले आहे.

तसेच इयत्ता पहिलीतील कुमारी श्रेया सचिन सोनवलकर हिने 150 पैकी 92 गुण मिळवले, तर कुमार शौर्य दीपक बादावटे याने 150 पैकी 54 गुण मिळवून यश संपादन केले.

इयत्ता तिसरीतील कुमार शौर्य संजय राठोड याने 300 पैकी 204 गुण, कुमारी हर्षिता नरेंद्र रहाटे हिने 198 गुण, तसेच देवांश गणेश किर्वे याने 146 गुण मिळवले. इयत्ता सहावीतील कुमारी गार्गी देवेंद्र भोसले हिने 124 गुण, तर इयत्ता सातवीतील कुमारी विधी गणेश किर्वे हिने 146 गुण मिळवत आपली गुणवत्ता दाखवून दिली.

या सर्व विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिनशेठ बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल बाईत तसेच मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचेही कौतुक करण्यात आले.

यावेळी दामोदर गोणबरे, सौ. शर्मिष्ठा साळुंखे, सौ. शितल सोनवलकर, सौ. शमीम मुल्ला, सौ. प्रांजली शिगवण तसेच तेजस केंबळे उपस्थित होते.

या यशामुळे परिसरात शाळेचे कौतुक होत असून विद्यार्थ्यांनी भविष्यातही असेच यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर

अकरावी प्रवेश 2026 : पहिली गुणवत्ता यादी उद्या जाहीर; 21 लाखांहून अधिक जागांसाठी 9 लाख विद्यार्थ्यांचे अर मुंबई विभागात सर्वाधिक...
Read More

मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

मुंबई महानगरपालिकेतील चार वादग्रस्त प्रस्तावांना अचानक मिळालेल्या स्थगितीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.  मुंबई महापालिका: 'मातोश्री'वरून मध्यरात्री फोन...
Read More
मुंबईत मध्यरात्री मोठं राजकीय नाट्य! मिलिंद नार्वेकरांच्या ‘त्या’ फोननंतर मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी कारवाई; शिंदे गटाला धक्का?

वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

. अखेर तो क्षण आला! समर देणार स्वानंदीला प्रेमाची जाहीर कबुली; 'वीण दोघांतली ही तुटेना'चा नवा प्रोमो व्हायरल! वरळीचा कट्टा...
Read More
वीण दोघांतली ही तुटेना: वरळी सी-लिंकच्या साक्षीने समर करणार स्वानंदीला प्रपोज, पाहा रोमँटिक प्रोमो!

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (मिलिंद मिरजकर): साहित्य भारती, ठाणे यांच्या वतीने ज्येष्ठ अभ्यासक आणि वक्ते सतीश सोळांकूरकर...
Read More
महाकवी दुःखाचा” कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता 'आभा कार्ड' (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश मुंबई: राज्यातील शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर...
Read More
शिक्षकांसाठी मोठी बातमी! आता ‘आभा कार्ड’ (ABHA Card) काढणे बंधनकारक; शिक्षण विभागाचे कडक आदेश

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा महायुतीत जागावाटपावरून रस्सीखेच; बहुजन विकास...
Read More
ठाणे विधान परिषदेत शिंदेंचं ‘धक्कातंत्र’?; रवींद्र फाटकांचा पत्ता कट होण्याची शक्यता, क्षितीज ठाकूरांच्या नावाची चर्चा

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण स्व. बाळासाहेब...
Read More
आम. भास्करशेठ जाधव यांच्या एका फोन मुळे उभळे विराडवाडी फाटा ते उभळे आरोग्य केंद्र रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर वाढत्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत...
Read More
सिंधुदुर्ग पर्यटन विकासासाठी मंत्रालयात आढावा बैठक; वाहतूक, स्वच्छता आणि सुविधांवर भर

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू नवीमुंबई (मंगेश जाधव) रायगडमधील आंबेनळी घाटात रविवारी रात्री भीषण अपघात...
Read More
आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ दरीत कोसळली; ८ जणांचा मृत्यू

पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना

प्रेयसीचे कान भरल्याच्या रागातून मित्राचा खून; सूरज झोरेवर कोयत्याने ३१ वार पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून...
Read More
पार्टीतील वाद, प्रेयसीबाबत कान भरल्याचा संशय आणि जुन्या रागातून घडली थरारक घटना