हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर निर्णय

चिपळूण : हुंड्यासाठी छळ करून ६ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण जिल्हा न्यायालयाने पती आणि सासूला प्रत्येकी १० वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी शनिवार, २ मे रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

तालुक्यातील डेरवण येथील काव्या दिनेश कदम (वय २५) हिने २१ नोव्हेंबर २०१६ रोजी घराशेजारील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी तिचा पती दिनेश महादेव कदम (वय ३४) आणि सासू मीनाक्षी महादेव कदम (वय ५७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयात सिद्ध झालेल्या माहितीनुसार, विवाहानंतर काही महिन्यांतच पती दिनेश कदम याने गाडी घेण्यासाठी माहेरहून १ लाख रुपये आणण्याचा तगादा लावला होता. मागणी पूर्ण न झाल्याने काव्याला सतत मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागत होता.

तिला मारहाण करणे, घराबाहेर काढणे, अपमानित करणे तसेच गर्भवती असतानाही कठोर कामे करण्यास भाग पाडणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. या सततच्या छळामुळे तिचे जीवन असह्य झाले आणि अखेर तिने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला.

या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ४९८(अ), ३०६ सह ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ८ साक्षीदार तपासून न्यायालयात प्रभावी युक्तिवाद मांडला. त्यामध्ये काव्याची आई, भाऊ, शेजारी तसेच तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.

शिक्षा कमी करण्याची आरोपींची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. आत्महत्या करणारी काव्या ६ महिन्यांची गर्भवती असल्याने या घटनेत दोन निष्पाप जीव गमावले गेल्याचे नमूद करत न्यायालयाने कठोर भूमिका घेतली.

न्यायालयाने आरोपींना कलम ३०६ अंतर्गत १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंड, तसेच कलम ४९८(अ) अंतर्गत ३ वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी १० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक शरद कुवेस्कर व सचिन इंगोले यांनी केला. हवालदार मिनाद कांबळे यांनी पैरवी म्हणून काम पाहिले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी. नवीमुंबई (मंगेश जाधव) डॉ. बी. आर. आंबेडकर ग्रुप, पनवेलकर संकुल, बदलापूर (पूर्व) यांच्या...
Read More
पनवेलकर संकुल येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी.

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू भाळवणी येथे लग्नसमारंभादरम्यान दुर्घटना; वडिलांना वाचवताना 20...
Read More
सांगली हादरली! येरळा नदीत पोहायला गेलेल्या 8 जणांचा जीव धोक्यात; युवतीचा दुर्दैवी मृत्यू

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा चिपळूण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल; ६ महिन्यांच्या गर्भवतीच्या आत्महत्येप्रकरणी कठोर...
Read More
हुंड्यासाठी गर्भवती विवाहितेचा छळ; पती आणि सासूला १० वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा

खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड रत्नागिरी : निलेश रहाटे खंडाळा परिसरात गुजरात पासिंग असलेली एक...
Read More
खंडाळा मध्ये गुजरात पासिंग आईस्क्रीम गाडीवर कारवाई; नियमांकडे दुर्लक्ष उघड

बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण

बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण आबलोली (संदेश कदम) बालकांनी केलेल्या धाडसी कामगिरीबद्दल त्यांना बालवीर पुरस्काराने सन्मानित...
Read More
बालजगतमध्ये ऐका बालवीरांच्या गोष्टी 3 मे रोजी आकाशवाणीवर प्रसारण

मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात

मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात ग्राहकांनी कलिंगड खरेदीकडे फिरवली पाठ;...
Read More
मुंबईतील मृत्यूच्या घटनेचा कलिंगड विक्रीवर परिणाम; कल्याण APMC मध्ये 12 ट्रक माल पडून, शेतकरी-विक्रेते संकटात

रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन, अवैध मद्यविक्रीवर संयुक्त कारवाईची मागणी रत्नागिरी...
Read More
रत्नागिरीत गोवा दारू तस्करीविरोधात परवानाधारकांचे लाक्षणिक उपोषण; महसूल बुडत असल्याचा आरोप

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र ६७ व्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रध्वजाला मानवंदना; विमानतळ, रेल्वे...
Read More
महाराष्ट्र दिनी रत्नागिरीत विकासकामांचा वर्षाव; पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे मोठे घोषणापत्र

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’ मुंबईतील ऐतिहासिक रुग्णालयाचे नाव बदलण्याच्या निर्णयावर निवासी डॉक्टर नाराज,...
Read More
केईएम रुग्णालयाच्या नामांतराला मार्डचा तीव्र विरोध; ‘नाव बदलून समस्या सुटत नाहीत’

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान

गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान   गुहागर -महाराष्ट्र जनता विकास प्रतिष्ठान या सेवाभावी...
Read More
गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे सर यांना राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार प्रदान