*महावाचन उत्सव अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन संपन्न.
गुहागर – (वार्ताहर ) महावाचन उत्सव अंतर्गत गुहागर तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शन चिखली नंबर एक शाळेमध्ये अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.त्यावेळी गुहागर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब ,सरपंच चिखली मानसिक कदम मॅडम ,उपसरपंच सुभाष दळवी साहेब, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष सचिन गमरे ,मुख्याध्यापक सुनील नार्वेकर ,विस्तार अधिकारी नामदेव लोहकरे, विस्तार अधिकारी विश्वास खर्डे, विस्तार अधिकारी, केशव क्षीरसागर, गुहागर तालुक्यातील सर्व केंद्रीय प्रमुख, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी ,मुख्याध्यापक ,शिक्षक व कर्मचारी तसेच तालुक्यातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते .सदर ग्रंथ प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.तालुक्यातील शिक्षक विद्यार्थी व पालक यांना या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ मिळाला .उद्घाटन प्रसंगी बोलताना गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे म्हणाले की आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये वाचन संस्कृती विकसित होणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांनी ठराविक वेळ हा वाचनासाठी राखून ठेवला पाहिजे .पुस्तकामुळे आपली मस्तक मजबूत होतात.दररोज वाचल्यामुळे आपल्या ज्ञानामध्ये भर पडत असते.स्पर्धेच्या या युगामध्ये वाचनाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.वाचनामुळे माणूस संस्कृत होतो.ग्रंथ हेच आपले खरे गुरु आहेत .वाचनामुळे विचारशक्तीचा विकास होतो .वाचनाने माणूस ज्ञानी होतो आणि त्याला पुस्तकाचे रूपाने एक नवीन मित्र मिळतो.वाचन ही एक कला आहे .वाचन माणसाला माणूस बनविते .जीवनाला एक नवी दिशा देते.विचार करायला शिकवते .अंतर्मुख करते त्याचप्रमाणे जीवनात योग्य अयोग्य काय याची जाणीव करून देते, आपल्या समाजात वाचाल तर वाचाल अशी म्हण आहे .आजचे हे ग्रंथ प्रदर्शन तर सर्व वाचकांसाठी एक पर्वणीच आहे ..कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक वृंदा ने प्रयत्न केले.