
महार रेजिमेंटचा’८४ वा स्थापना दिवस १ ऑक्टोबर रोजी सन्मान सोहळा म्हणून साजरा होणार..!
यश सिध्दी माजी सैनिक संघ, महाराष्ट्र राज्य यांचा स्तुत्य उपक्रम..!
आबलोली (संदेश कदम)…….
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने १ ऑक्टोबर १९४१ रोजी स्थापन झालेली भारतीय पायदळ सेनेतील अनेक पदकांनी गौरवाकींत असलेली महार रेजिमेंट या महार रेजिमेंटचा ८४ वा स्थापना दिवस आणि याच महार रेजिमेंटच्या माजी सैनिकांनी स्थापन केलेल्या यश सिद्धी माजी सैनिक संघ (रजि.) महाराष्ट्र राज्य प्रधान कार्यालय :चिपळूण, रत्नागिरी – मुंबई या संघटनेचा वर्धापन दिन असा संयुक्त सन्मान सोहळा हा सन्मान सोहळा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १ ऑक्टोबर २०२४ ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल , गोकुळदास पास्ता रोड , दादर (पूर्व), मुंबई-१४ येथे सकाळी १०.०० वाजता यश सिध्दी माजी सैनिक संघ,महाराष्ट्र यांचे वतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
देश है पुकारता , पुकारती भारती | खून से तिलक करो गोलियों से आरती | या समर्पित जयघोषाने आजतागायत युद्ध व शांततेच्या काळात शौर्यनेआणि धैर्याने संधीचे सोने करून अतुलनीय पराक्रमाची शौर्य परंपरा राखून वीरता,साहस , कर्तुत्व आणि बलिदान , त्यागा समवेत राष्ट्रनिष्ठेचा , राष्ट्रप्रेमाचा आदर्श घालून दिला , त्या भारतीय सैन्य दलातील महार रेजिमेंटला अखिल विश्वात तोड नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नांनी स्थापना झालेल्या या महार रेजिमेंटचा स्थापना दिवस (रेजिंग डे) आणि यश सिद्धी माजी सैनिक संघ (रजि) महाराष्ट्र राज्य या संघटनेचा वर्धापन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन हॉल,दादर , मुंबई येथे आयोजित करण्यात आलेला आहे . याप्रसंगी मातृभूमी रक्षणार्थ शहीदांना मानवंदना व अभिवादना समवेत महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण, बुद्ध पूजापाठ, प्रमुख पाहुण्यासह आजी-माजी सैनिकांचे स्वागत व सत्कार , मान्यवरांचे मनोगत व शुभेच्छा, स्नेहभोजन आणि भीमसूर्य समतेचा या ऑर्केस्ट्राचे सादरीकरण होईल.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष निवृत्त सुभेदार मेजर दत्ताराम मोहिते, स्वागताध्यक्ष सुभेदार प्रकाश कांबळे व हवलदार राजेश पवार यांच्या अधिपत्याखाली सदर कार्यक्रम संपन्न होईल. प्रामुख्याने विचार पीठावर प्रमुख मान्यवरांपैकी आदरणीय भिमराव यशवंतराव आंबेडकर ( विश्वस्त/ राष्ट्रीय कार्याध्यक्ष , भारतीय बौद्ध महासभा व राष्ट्रीय अध्यक्ष , समता सैनिक दल ) , मेजर प्रांजल जाधव (जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मुंबई जिल्हा) आयु. माधवराव शिर्के (IRS ऑफिसर/ रिटायर्ड इन्कम टॅक्स डेप्युटी कमिशनर ऑफ मुंबई व माजी अध्यक्ष, खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ, मुंबई) आणि आयु. संजयराव शांताराम कदम (मुख्य प्रवर्तक, मातोश्री लक्ष्मीबाई कदम स्मृती मंच , खेरशेत, चिपळूण) आदी. मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
या भव्य दिव्य महार रेजिमेंटच्या स्थापना दिवसाच्या अनुषंगाने आणि संघटनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने बौद्ध धम्मातील बंधू/ भगिनींनी , समता सैनिकांनी विविध समाजातील प्रज्ञावंत समाज घटकांनी , इतर सैन्य दलातील आजी-माजी सैनिकांनी, अधिकाऱ्यांनी राष्ट्रप्रेम, राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रभिमानाच्या हर्षोल्हासात सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी.अशी विनंती ज्येष्ठ सल्लागार हवलदार शांताराम सावंत, सुभेदार भाऊ पवार , कार्याध्यक्ष चंद्रकांत कदम , सचिव हवलदार संजय तांबे , हवलदार रमेश कदम आणि कॅप्टन प्रल्हाद ठाकूर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
plz join Ratnagiri vartahar whatsapp group ????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv