गुहागर तालुका काँग्रेस कमिटी च्या नव्या नियुक्त्या जाहीर..
वसीम साजिद टेमकर -पडवे, विजय विचारे-चिखली, साहील पांडुरंग धातकर नव्या चेहऱ्यांना संधी.
गुहागर -(वार्ताहर)…. गुहागर काँग्रेस कमिटी ची नुकतीच आढावा सभा पार पडली. या सभेस तालुक्यात साघटना बळकट करण्यासाठी साठी तरण वर्गाला संधी देण्यात आली आहे.
गुहागर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री मिलिंद आत्माराम चाचे यांनी गुहागर ची जबाबदारी मिळाल्यावर काँग्रस चे जुने नवे कार्यकर्ते यांना एकत्रित करून तालुक्यात विवीध पदांची जबाबदारी तरूण कार्यकर्ते यांच्यावर दिली आहे, आज झालेल्या बैठकीत श्री. अध्यक्ष मिलिंद चाचे यानी गुहागर तालुका काँग्रेस कमिटी च्या कार्यकारणी मध्ये, श्री. वसीम साजिद टेमकर, (मुक्काम पोस्ट – पडवे खालचा मोहल्ला तालुका गुहागर ) यांची गुहागर तालुका काँग्रेस उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे तसेच चिखली गावचे जुने जाणते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते श्री. विजयजी विचारे यांची ही गुहागर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. कुडंली गावाचे तरूण कार्यकर्ते व मिलिंद चाचे यांचें खंदे समर्थक साहिल पाडूरांग धातकर यंची गुहागर तालुका काँग्रेस कमिटी चे सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
नवनिर्वाचित सर्व कार्यकारणी पदाधिकारी यांचे गुहागर काँग्रेस अध्यक्ष श्री.मिलिंद चाचे यानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या शुभेछापर संदेशात श्री. मिलिंद चांचे यानी गुहागर तालुका मधे काँग्रेस नव्या चेहऱ्यांना संधी देऊन त्यांना तालुक्या तील सघटना बळकट करण्यासाठी आणि विविध प्रकारच्या विकास कामासाठी आपण त्यांचे पाठीशी राहु असे म्हटले आहे.