रत्नागिरी मधील प्रादेशिक मनोरुग्णालय पश्चिम महाराष्ट्रात जाऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी यांना निवेदन..!
आबलोली (संदेश कदम)…….
इंग्रजाच्या काळात बांधण्यात आलेले प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी हे पश्चिम महाराष्ट्रात हलवीण्याच्या शासनाच्या हालचाली सुरु झाल्याचे वृत दैनिक सकाळ या वृत्तपत्रात प्रशिद्ध होताच, वंचित बहुजन आघाडी दक्षिण रत्नागिरी जिल्हा पदाधिकारी यांचे रत्नागिरी जिल्हाधिकारी, आणि रत्नागिरी जिल्हा परिषद सीईओ यांना नुकतेच निवेदन सादर करण्यात आले आहे. हे निवेदन सादर करताना वंचित बहुजन आघाडी दक्षिण जिल्हा रत्नागिरीचे जिल्हा अध्यक्ष आयु. गौतम गमरे, महासचिव आयु. मुकुंद सावंत, रवींद्र कोकरे, काका जोशी, महिला जिल्हाअध्यक्षा – सौ. जयेश्री बेटकर मॅडम, सुभाष जाधव, राजेंद्र कांबळे, श्रीपत मोहिते, राकेश कांबळे, प्रमुख संघटक, एसी. सी. कांबळे, अनंत सावंत, सुनील कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
plz आमच्या whatsapp group ला join व्हा ????
https://chat.whatsapp.com/L2mwcucEQKdBtE5N3lmPrv