जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणार.- राहुल गांधी

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 

कोल्हापूर – राहुल गांधी यांनी थेट मुद्द्यालाच हात घातला, कोल्हापूरच्या सभेत तीन मोठ्या घोषणा; विधानसभेच्या तोंडावर गणित बदलणार का?

जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आम्हाला माहीत आहे की मार लागलाय. पण मार किती लागलाय माहीत नाही. नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्याचा आम्ही एक्सरे करणार आहोत. जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणार.

जातीनिहाय जनगणना हा हिंदुस्थानचा एक्सरे आहे. आम्हाला माहीत आहे की मार लागलाय. पण मार किती लागलाय माहीत नाही. नेमकं काय होतंय हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. त्याचा आम्ही एक्सरे करणार आहोत. जातीनिहाय जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा आम्ही वाढवणारच, राज्यसभा आणि लोकसभेत आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा आणि जातिनिहाय जनगणनेचा प्रस्ताव मंजूर करून घेणार, असं काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. मोदी असो की भाजप कोणीही रोखू शकणार नाही. या दोन गोष्टी केल्यावरच खरं राजकारण सुरू होईल. जातीनिहाय जनगणना सुरू झाली तर सर्व डेटा आपल्या हाती असेल, असंही त्यांनी नमूद केलं. कोल्हापूरमध्ये बोलत असताना त्यांनी तीन मोठ्या घोषणा केल्या.

आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणार , जातीनिहाय जनगणना करणार आणि सोशिओ इकॅानॅामिक सर्व्हे करणार अशा तीन घोषणा राहुल गांधी यांनी कोल्हापुरातील संविधान सन्मान संमेलनात केल्या.

RV. Reporters
Author: RV. Reporters

Guhagar Office .. * Ratnagiri vartahar Digital News * ..

  • AD-3

Leave a Comment

  • AD-3

आणखी वाचा...

  • AD-3

04:45