मतदान जागृती जाणीव :दापोली बस स्थानकात पथनाट्यातून मतदान जागृती

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मतदान जागृती जाणीव :दापोली बस स्थानकात पथनाट्यातून मतदान जागृती

दापोली: (वार्ताहर)-विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक विभागातर्फे शिक्षण विभाग दापोलीचे स्विप कलापथक गावोगावी जाऊन लोकप्रबोधन करीत असून काल दापोली बसस्थानक तसेच केळसकर नाका येथे मतदान जाणीव जागृती करत विविध गीततगायन तसेच नाटिका सादर करणेत आल्या. स्विपचे नोडल आॅफीसर तथा गटशिक्षणाधिकारी अण्णासाहेब बळवंतराव, सहा.नोडल अधिकारी बळीराम राठोड यांचे मार्गदर्शनात दापोली विधानसभा मतदारसंघांतर्गत शिक्षण विभागातील शिक्षकांच्या कलापथकाने जनजागृती रॅली काढून पथनाट्य सादर केले.
ज्यांना मतदानाचा अधिकार आहे, त्या सगळ्यांनी मतदान करावे, असे आवाहन पथनाट्याच्या माध्यमातून करण्यात आले. पथकातील शिक्षकांनी घोषणा व गाणी म्हणत तसेच जनजागृतीपर नाटिका सादर करत २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी आपले बहुमोल मत देण्याचे आवाहन केले. हर्णे, गावतळे, दापोली बसस्थानक केळसकर नाका,पालगड अशा विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले.
या पथनाट्याच्या आयोजनावेळी गावा- गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ, पोलिस पाटील यांचेसह शाळांमधील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. बसस्थानकातील प्रवासी-प्रेक्षकांनी या जनजागृतीपर पथनाट्याचे कौतुक केले. तसेच आम्ही विधानसभेसाठी १००% मतदान करु अशी ग्वाही देत पथकाचे कौतुक केले.
तसेच इतरांनाही सहभागी मतदिन करण्यास प्रवृत्त करू, असे अभिवचन ग्रामस्थांनी दिले. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीआधी जनजागृतीचे विविध उपक्रम राबवले होते. तसेच उपक्रम विधानसभेसाठी सुरु असल्याबाबत अण्णासाहेब बळवंतराव आणि बळीराम राठोड यांनी सांगितले.
सदर पथकातून संजय मेहता,बाबू घाडिगावकर,महेश गिम्हवणेकर,महेश शिंदे,वैजयंत देवघरकर,अल्केश नार्वेकर,नितीन गुहागरकर,सुनिल व विलास साळूंखेंसह अस्मिता बालगुडे,संजिवनी लाडे,सुनंदा मळगे स्मिता कदम,राहूल राठोड आदि.शिक्षक मतदान जाणीव जागृती करीत आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार