जरांगें पाटील समर्थक गणेश अरुण कदम यांनी डोंबिवली मधून उमेदवारी अर्ज मागे

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जरांगें पाटील समर्थक गणेश अरुण कदम यांनी डोंबिवली मधून उमेदवारी अर्ज मागे का?घेतला..!

पत्रकारांशी केला खुलासा

आबलोली (संदेश कदम)

गेल्या लोकसभेला महायुतीला जरांगें फॅक्टर चांगलाच महागात पडल्याने विधानसभेला जरांगेंनी उमेदवार उभे करावे म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या महायुतीच्या मित्रपक्षांची घोर निराशा झाली आहे याचं कारणही तसं आहे याबाबत पत्रकारांशी खुलासा केला आहे.

याबाबत डोंबिवली मधील जरांगे पाटील समर्थक उमेदवार गणेश कदम पत्रकारांशी खुलासा करताना म्हणाले की,त्याचं झालं असं, जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे केले तर महायुतीवर विशेषता देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असलेल्या मराठा समाजाची मतं महाविकास आघाडी आणि मराठा उमेदवार यांच्यात विभागली जाऊन युतीचे उमेदवार जास्त प्रमाणात निवडून येण्याची शक्यता राजकीय अभ्यासक यांनी वर्तवल्याने लागलीच भाजपाने IT सेलच्या माध्यमातून जरांगें पाटील यांनी उमेदवार उभे करावे म्हणून मराठा समाजाला डिवचण्यास सुरुवात केली आणि त्यात त्यांना यशही आहे.

कोणी आव्हान केल्यावर लगेच स्वीकार करणारा समाज अशी ख्याती असल्याने समाजाने पाटील यांना निवडणूक लढवण्यासाठी आग्रह केला व पाटील यांनीही समाजाच्या भावना लक्षात घेऊन सर्व मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे फर्मान सोडून सर्व इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले.

पण पुढे झालं असं जरांगें यांच्या प्रामाणिक आणि रोखठोक भूमिकेमुळे करोडो समाज एकत्र आला खरा पण त्यात संघटनात्मक बांधणी नसल्याने एकएका मतदारसंघातून 20/25 इच्छुक उमेदवार तयार झाले, आता एवढ्या लोकांची मनधरणी करून एका मतदार संघात एक उमेदवार देणं हे गणित किती किचकट आहे, शिवाय एका समाजाच्या मतांवर किती उमेदवार निवडून येणं शक्य आहे याचा गांभीर्याने विचार केल्यावर मोठ्या संघर्षातून एक झालेला करोडो मराठा समाज एकत्र राहावा म्हणून एकही उमेदवार उभा न करण्याचा धाडसी निर्णय जरांगें यांनी घेतला व उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी काही तास शिल्लक असताना सर्वांना अर्ज मागे घेण्यास सांगून जरांगेंनी भर दिवाळीत महायुतीवर जणू काही राजकीय बॉम्बच टाकल्याने सर्वांचं गणित कोलमंडलं.

माताभगिनींवर झालेला लाठीचार्ज, त्यांचं सांडलेलं रक्त, कारण नसताना पाटील यांच्यामागे लावलेली SIT, वाशीला दिलेलं आश्वासन, आंदोलकांवरील गुन्हे कायम ठेवणं यासर्वामध्ये मुख्य सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका बजावल्याने बीजेपीचा सुपडा साफ करण्यासाठी लढणं नाही तर पाडणं ही भूमिका योग्य असल्याने उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाटील यांच्यासोबत कायम असल्याचे मतं गणेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे

Sandesh Kadam
Author: Sandesh Kadam

संदेश कदम, अबलोली. रत्नागिरी वार्ताहर. डिजिटल मिडिया गूहागर तालुका समन्वयक

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग   ठाणे (गुरुदत्त वाकदेकर) : मराठा मंडळ, ठाणे...
Read More
मराठा मंडळ ठाणे यांची भव्य शिव चित्रकला स्पर्धा; १६५ विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
पांड्याची अष्टपैलू चमक; नामिबियावर भारताचा ९३ धावांनी दणदणीत विजय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सिंधुरत्न समृद्ध योजनेसाठी ५०० कोटींची मागणी...
Read More
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ७३०.२५ कोटींचा वार्षिक आराखडा मंजूर; विकासाला नवी गती देणारे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; 'रॉयल इलेव्हन' कडून विद्यार्थ्यांचा गौरव आबलोली (संदेश कदम) रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर...
Read More
माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या एकजुटीने आवरे शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात; ‘रॉयल इलेव्हन’ कडून विद्यार्थ्यांचा गौरव

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : जगभरात हृदयरोग मृत्यूचे...
Read More
हृदय निरोगी ठेवण्यासाठी ‘हार्टस्ट्रॉंग’ मार्गदर्शक; डॉ. कौशल छत्रपती यांचे नवे पुस्तक प्रकाशित

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
रत्नायके–शानाकाच्या वादळी खेळीने श्रीलंकेचा ओमानवर १०५ धावांनी दणदणीत विजय

श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

*श्रीरामपूर शहरवासीयांची* *गत झाली केवीलवाणी!*   *प्यावे लागत आहे चक्क* *दुर्गंधीयुक्त घाण पाणी !!*   ----------------------------------------- श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे...
Read More
श्रीरामपूर नगर पालिकेच्या नळाद्वारे शहरवासीयांना पिण्यासाठी दुर्गंधीयुक्त घाण पाण्याचा पुरवठा, नागरीकांचे आरोग्य धोक्यात ?

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी–२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
एलिस–झाम्पाच्या गोलंदाजीसमोर आयर्लंड गारद; ऑस्ट्रेलियाचा ६७ धावांनी दणदणीत विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील...
Read More
दोन सुपर ओव्हरचा थरार : दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानवर संस्मरणीय विजय

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका

मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका : “मराठी माणूस जिंकत असेल तर आम्ही विघ्न...
Read More
मुंबई महापौर निवडणूक बिनविरोधच्या दिशेने; ठाकरे गटाची माघार, किशोरी पेडणेकरांची स्पष्ट भूमिका
Play sound