गुहागर विधानसभा -संविधानाच्या रक्षणासाठी ‘वंचित’चे सुनिल जाधव मैदानात
‘ वंचित’सह अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पाठिंबा
गुहागर ( अशिष कारेकर प्रतिनिधी ): सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून २६४- गुहागर विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सुनिल जाधव ( माजी सैनिक ) हे रिंगणात उतरले आहेत. सध्याची राजकीय स्थिती पाहता महायुती आणि महाविकास आघाडीला संविधानाचा विसर पडला आहे. संविधान धोक्यात असल्याच्या वल्गना करणारे महाविकास आघाडीचे नेतेही दिखावा करून फक्त मतदान मिळविण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. मात्र जनतेला आता यांचा दिखावा समजला आहे. त्यांना संविधानाचे पालन करून धर्मनिरपेक्ष काम करणारा उमेदवार पाहिजे आहे. यामुळे संविधानाचे रक्षण करून समता प्रस्थापित करण्यासाठी मी रिंगणात उतरलो असल्याचे सुनिल जाधव यांनी सांगितले. यामुळे सुनिल जाधव हे जरी अपक्ष उमेदवार असले तरी मतदार संघातील वंचितचे गुहागर, चिपळूण, खेड येथील कार्यकर्ते, मतदार यांचेसह अन्य संघटनेच्या कार्यकर्त्यांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.
सुनिल जाधव हे गुहागर तालुक्यातील स्थानिक उमेदवार आहेत. तालुक्यातील सर्व समाजामध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत. तसेच प्रत्येकाच्या सुखदुःखात ते सहभागी असल्याने त्यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. त्यामुळे सध्याच्या स्वार्थी, मतलबी, नीतिमत्ता सोडलेल्या राजकीय पुढाऱ्यांना कंटाळलेले मतदारांसमोर अपक्ष उमेदवार सुनिल जाधव हा एक चांगला पर्याय असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्यांना भेटून छुपा पाठिंबा दर्शविला आहे. तर आंबेडकरी चळवळीतील एकही उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यात नसल्याने येथिल बहुजन समाज पार्टी सह अन्य चळवळीतील कार्यकर्ते यांनीही सुनिल जाधव यांना पाठिंबा दिला आहे.
सध्याच्या स्वार्थी, मतलबी, नीतिमत्ता सोडलेल्या राजकीय पुढाऱ्यांना कंटाळलेल्या मतदारांसमोर अपक्ष उमेदवार सुनिल जाधव हा एक चांगला पर्याय असल्याचे अनेकांकडून बोलले जात आहे. अनेक सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते त्यांना भेटून छुपा पाठिंबा दर्शविला आहे. तर आंबेडकरी चळवळीतील एकही उमेदवार रत्नागिरी जिल्ह्यात नसल्याने येथिल बहुजन समाज पार्टी सह अन्य चळवळीतील कार्यकर्ते यांनीही सुनिल जाधव यांना पाठिंबा देवून प्रचारामध्ये सहभागी झाले आहेत.
एकंदरीत सुनिल जाधव हे या मतदार संघामधून चांगले मताधिक्य मिळवतील असे चित्र निर्माण झाले आहे.