महाविकास आघाडीचे तरुण तडफदार उमेदवार प्रशांत यादव यांची जोरदार मुसंडी
चिपळूण संगमेश्वर विधान सभा मतदारसंघातून प्रशांत यादव विजयी होणार
विविध संघटनांचाही पाठिंबा.
*संगमेश्वर तालुक्यातील विविध योजनेंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे मतदार नाराज असल्याने प्रशांत यादव यांना संधी मिळण्यासाठी मतदार प्रशांत यादव यांच्या पाठी*
“सध्या विचारधारेवर निवडणूका लढविल्या जात नसून पैशाची फार मोठी उलाढाल केली जात आहे.सत्तेच्या काळात जनतेच्या विकास योजनेतून पैसा दडवाय चा आणि निवडणूकीच्या काळात तो उधळायचा हा आता शिरस्ता झालेला आहे.२४९० कोटी रुपयांची विकासकामे चिपळूण संगमेश्वर मतदार संघात झाली असल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे परंतु विकास कामे आहेत कुठे?
कोणाचा विकास केला गेला?आमसभा चार वर्षांनी झाली पण तीही या ना त्या कारणाने गाजली नागरिकांच्या प्रश्नांना सहकार्य करण्यापेक्षा अधिकारी यांना सहकार्य केले गेले.तक्रारदारांना अर्जदारांना कंटाळून जाण्यासाठी पूर्व नियोजन करण्यात येऊन आमसभा निवडणूक समोर ठेऊन पुरस्कार देण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे उपस्थित जनते मध्ये चर्चा होती.
तालुक्यातील विकास निधी गेला कुठे?
*जल जीवन मिशन योजनें तर्गत झालेली कामे निकृष्ट*
*90 टक्के कुटुंबांना पाणी नाही.मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार*
*रस्ते तीन महिनेही राहिले नाहीत.रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे? नागरिक,प्रवाशी वर्गाची संभ्रमावस्थेत.*
*देवरूख शहरात 2021 मध्ये छ.शिवाजी महाराजांचा पुतळा उभारावायचा होता त्याचे अद्याप ठाव ठिकाणा नाही.*
*महिलां व पुरुषांसाठी छ. शिवाजी चौक येथे सुलभ शौचालय साठी कोणतीही उपाय योजना नाही*
अनेक वर्षे वाळू माफियांचा उद्रेक असून मोठ्याप्रमाणात वाळू, माती उत्खनन,वाहतूक होत असून शासनाचा महसूल बुडविण्यात आला आहे
अनेक वर्षे अनेक ठिकाणी सी सी टिव्ही यंत्रणा नसल्याने अवैध्य धंद्यांना पाठीशी घातले जात आहे
अनेक अपघात, माऱ्यामाऱ्या तसेच चोऱ्या झालेल्या असून सी सी टिव्ही यंत्रणा नसल्याने गुन्हेगार मोकाट राहिले
एकाच रस्त्यावर कालावधी संपण्यापूर्वी त्याच रस्त्यावर दुसऱ्या योजनेतून निधी आणायचा आणि विकासाच्या नावाखाली लूट झाली आहे.
आमसभेत अर्जदारांनी मांडलेल्या आपल्या प्रश्नांवर कोणतीही कारवाई नाही
महागाई मुळे नागरिक त्रस्त आहे
“पाच वर्षाच्या काळात महागाई, बेरोजगारी वाढली आहे.एमआय डीसी असूनही कंपन्या आणण्या चे प्रयत्न झालेले नाहीत त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगार नाही.
डम्पिंग ग्राउंड,नगरपंचायत इमारत अनेक वर्षे झाली तरी बांधकाम पूर्ण नाही.
नगरपंचायतीचे उत्पन्न वाढीसाठी इमारत बांधताना व्यापारी गाळे बांधणे आवश्यक होते. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळाला असता व पंचायतीला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला असता.
परंतु नियोजनाचा अभाव व निधी खर्ची टाकण्याची घाई त्या मुळे तालुक्याला विकासापासून वंचित ठेवण्यात आले आहे. संगमेश्वर चिपळूण येथील जनता संयमी आणि सुज्ञ आहे.ते योग्य तो न्याय देतील”
संगमेश्वर तालुक्यातील जनतेची विकासाचे नावाखाली फसवणूक झालेली आहे.
त्यामुळे विकासाच्या नावाने लूट झाली असून जनता कंटाळली आहे. जनतेने सारासार विचार करून नूतन उमेदवार प्रशांत यादव यांना निश्चित संधी देतील.जनता उघड्या डोळ्यांनी विकास पहात आहेत.आता जनतेला नवीन उमेदीचा उमेदवार हवा आहे असे सामाजिक कार्यकर्ते व आर टी आय कार्य कर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य चे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव व तालुकाध्यक्ष शेखर जोगळे यांनी सांगितले.