विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही – रश्मी गोखले यांची टिका..!
आबलोली (संदेश कदम)
मी जेव्हा गुहागर तालुक्यात आली आहे .मी गुहागर तालुक्यात फिरतेय त्यामुळेच मला समजतेय की, या इथे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी काहीही विकास केलेला नाही अशी टिका शिवसेना शिंदे गटाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा महिला संघटक रश्मी गोखले यांनी गुहागर तालुक्यातील आबलोली येथे पत्रकारांशी बोलताना केली.
शिवसेना शिंदे पक्ष, भाजपा, रिपब्लिकन पक्ष आठवले, राष्ट्रवादी अजितदादा आणि बळीराज सेना मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार माजी आमदार,लोकनेते,स्वर्गीय रामभाऊ बेंडल यांचे सुपूत्र, माजी सभापती, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांच्या आबलोली येथील प्रचार दरम्यान आबलोली वरची पागडेवाडी येथील सभागृहात आबलोली येथील पत्रकारांशी उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटक रश्मी गोखले यांनी संवाद साधला
यावेळी त्यांनी विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी गुहागरचा विकास केला नाही अशी टिका करुन मी या मतदारसंघातील १५ गाव फिरले, ७२ गाव फिरले परंतू मला तिथे विकास झालेला दिसलाच नाही. १५ गावात मी रामदास भाई यांचे समवेत फिरले रस्त्या बद्दल खूप राग आला तेथील रस्ते असे आहेत की बैलगाडीतच बसलेय असा मला भास होत होता. म्हणजे विकास कुठ केला मग २० वर्ष तुमच्या हातात जर इथली सत्ता होती परंतू तुंम्ही लोकांसाठी काहिहि करु शकत नाही म्हणूनच मी गुहागर तालुक्यातील जनतेला विनंती वजा आवाहन करीत आहे की, या वेळेला तुंम्ही बदल घडवा. आता इथे बदल हवाय आपल्याला जर आपल्याला विकास हवा असेल आपला सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर आपल्याला इथे बदल घडवायला हवा आहे त्यासाठी महाविकास आघाडीचे गुहागर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेश बेंडल यांच्या धनुष्यबाण निषाणी समोरील बटन दाबून राजेश बेंडल यांना विक्रमी मतांनी निवडून आणा असे स्पष्ट मत रश्मी गोखले यांनी मांडले
जर विकास झाला नाही असे तुंम्ही म्हणताय तर गेले तीन टर्म भास्करशेठ जाधव या गुहागर विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात जर विकास केला नाही तर इथली मतदार जनता त्यांच्या पाठी का? उभी रहाते या हा प्रश्न माझ्या सारख्या अनेक पत्रकारांना पडतोय या प्रश्नावर उत्तर देताना रश्मी गोखले पुढे म्हणाल्या की,हा प्रश्न आंम्हाला हि पडतोय या का? चे उत्तर आपण देऊ शकत नाही. कारण आज त्यांचे एवढे इथे वर्चस्व आहे की, कारण लोक घाबरत असतील त्यांना इथली गावातली साधी लोकं आहेत हि शहरातली लोकं नव्हेत.
कोणत्या पध्दतीचा विकास होणे गरजेचे आहे. तुमची अपेक्षा काय आहे या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मी गोखले म्हणाल्या की, मी गुहागर तालुक्यात आलेय अंजनवेल येथील मी शाळा बघितल्या या शाळेत विज पुरवठा नाही फॅन नाही तरी ती मुले शाळेत बसतात १५ -१५ पाणी येत नाही. पाण्याचा गंभीर प्रश्न आहे.असे सांगून रश्मी गोखले पुढे म्हणाल्या मला सांगा गुहागर आहे हे गुहागर आता किती डेव्हलप व्हायला पाहिजे होते पण गुहागर डेव्हलप झाले का? गुहागरला पर्यटक ज्या प्रमाणात येतात त्या प्रमाणात गुहागर डेव्हलप झालेले नाही असेहि रश्मी गोखले यांनी सांगितले
तुंम्ही राजेश दादा यांचा प्रचार करताय तुमच्या काय अपेक्षा आहेत. तुंम्ही काय डेव्हलप करणार, तुंम्ही कोणत्या उपाय योजना करणार आणि विकासात्मक कोणते मुद्दे घेऊन जाणार या प्रश्नाचे उत्तर देताना रश्मी गोखले यांनी आवर्जून उल्लेख केला की, पहिलं शाळा आणि त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न, महिलांच्या जवळचा प्रश्न महिलांना आजही दूर वरुन पाणी आणावे लागते महिलांच्या डोक्यावरील हंडा खाली उतरला पाहिजे, रस्ते चांगल्या दर्जाचे झाले पाहिजेत वाडी वस्तीवर, घरा घरापर्यंत रस्ते, पाखाड्या झाल्या पाहिजेत लोकांना सोयी सुविधांचा लाभ मिळालाच पाहिजे असे स्पष्ट मत शिवसेना शिंदे पक्षाच्या उत्तर रत्नागिरी जिल्हा संघटक रश्मी गोखले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेच्या चिपळूण तालुका महिला शहर समन्वयक तेजस्विता साटम, शिवसेनेच्या गुहागर तालुका महिला कार्यकर्त्या मिलन कनगुटकर, आबलोलीच्या माजी सरपंच श्रावणी पागडे,प्रिती पागडे, तृप्ती पागडे आदी. महिला उपस्थित होत्या.
संपूर्ण मुलाखत आमच्या रत्नागिरी वार्ताहर चे RV News YouTube वर पहा ????????