अन्यथा बौद्ध धम्म संघटना तीव्र आंदोलन छेडतील निवेनाव्दारे तहसीलदार,पोलीस निरीक्षक आणि प्रशासकीय यंत्रणेला गुहागर तालुक्यातील बौद्ध धम्म संघटनांचे निवेदन सादर
आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील दोडवली बौद्धवाडी येथील आमचे बौद्ध समाज बांधव विकास तथा अण्णा जाधव यांच्यावर दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी नरवण येथे सावली हॉटेल येथे जेवणासाठी थांबले असताना मोटार सायकल वरुन आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्यांचेवर जीवघेणा हल्ला केला. यामध्ये अण्णा जाधव यांच्या हातावर खोलवर वार करून त्यांना जखमी करण्यात आले आहे. सर्व प्रथम या जीवघेण्या हल्ल्याचा आंम्ही गुहागर तालुक्यातील बौद्ध धम्म संघटना यामध्ये बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर, भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी जे – णे करुन बौद्ध समाजाच्या कोणत्याही व्यक्तीवर हल्ला होता कामा नये
सदरील हल्ला का? करण्यात आला?. आणि यामध्ये असणाऱ्या हल्लेखोरांनी कुणाच्या सांगण्यावरुन हा हल्ला केला? याचा तातडीने तपास होणे गरजेचे आहे. या घटनेमुळे समाजात तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे या गुहागर तालुक्यातील बौद्ध संघटनांचे वतीने निवेदन देण्यात येत आहे. या घटनेचा तातडीने तपास व्हावा व गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच २५ 2 नोव्हेंबर २०२४ पर्यंत या घटनेतील गुन्हेगारांना अटक करुन त्यांचेवर कायदेशीर योग्यती कारवाई करण्यात यावी. अन्यथ: दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनी आंम्ही उग्र आंदोलन करुन रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही. असा गंभीर इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून गांभीर्याने आमच्या मागणीचा विचार करून गुन्हेगारांना तातडीने अटक करुन त्यांचेवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी अशी आग्रही मागणी १) बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे तालुका अध्यक्ष सुरेश सावंत, कार्याध्यक्ष मारुती मोहिते, सरचिटणीस सुनिल गमरे, भारतीय बौद्ध महासभा तालुका गुहागर अध्यक्ष विद्याधर, जितेंद्र जाधव, भारतीय बुद्ध सासन सभा तालुका अध्यक्ष अनंत मोहिते, सरचिटणीस प्रभाकर सुर्वे, आबलोली शाखा अध्यक्ष दत्ताराम कदम यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
???? आण्णा जाधव यांचे हल्ल्या वरील सविस्तर बातमी हि वाचा ????????
https://ratnagirivartahar.in/archives/4374