राष्ट्रवादी कुणाची?. ४० जागांवर शरद पवार विरुद्ध अजित पवार. कोण कुणावर वरचढ ठरणार? राष्ट्रवादी कुणाच?
पुणे – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी नंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोल्सनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का दिला आहे. पोल्सनुसार, त्यांच्या पक्षांना अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवारांना मात्र जास्त जागा मिळण्याचा अंदाज आहे. ४० जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झाल्याने या निवडणुकीत अनेकांचे राजकीय भविष्य निर्धारित होणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला कोणाकडे जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
काल पार पडलेल्या मतदानात अनेक नेत्यांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झालं आहे. राज्यात 40 जागांवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना झालाय.पश्चिम महाराष्ट्र जो नेहमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय तो यंदा अजितदादांना कौल देणार की शरद पवारांना याकडेही महाराष्ट्रा च्या नजरा आहेत.शिवसेनेप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादींमध्येही 40 जागां वर सामना आहे. त्यामुळे पवार काका-पुतण्यांच्या लढाईत कोण कुणावर वरचढ ठरेल याचा फैसला या ४० जागांवरचे निकाल ठरवतील.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या दोन प्रमुख पक्षां मध्ये उभी फूट पडल्यामुळे राज्यात विचित्र अशी राजकीय स्थिती निर्माण झाली. या दोन्ही पक्षांचे गट सत्ताधारी बाजूलाही होते आणि विरोधी बाजूलाही. गेल्या वर्षी अजित पवारांसंह राष्ट्रवादीचे बहुसंख्य आमदार सत्ताधारी बाजूला गेले. त्यामुळे ही पक्षासोबतच पवार कुटुंबातही फूट पडल्याचं मानलं जात आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या नामुष्कीचा सामना करावा लागला. अजित पवार गटाला ४ जागा मिळाल्या होत्या.पण त्यात फक्त एका जागे वर त्यांना विजय मिळवता आला त्याउलट शरद पवार गटाला १० जागांपैकी ८ जागांवर विजय मिळाला आहे. विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणूक निकालाचीच पुनरावृत्ती होईल असं मानलं जात असताना आता मतदानोत्तर चाचणी अर्थात एक्सिट पोल्स आलेल्या आकड्यांवरून तर्क -वितर्क लावले जात आहेत.