आझाद मैदानावर होणार महायुती सरकार चां शपथ विधि सोहळा.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

 महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होण्याची शक्यता

मुंबई— महायुती सरकारचा शपथविधी नेमका कधी आणि कुठे होणार? याकडे देशाचे लक्ष लागले आहे. आता याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ५ डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर होणार असल्याची माहिती मिळत आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच महायुतीत मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत जोरदार चर्चा रंगल्या होत्या. भाजपने या निवडणुकीत १३२ जागांवर विजय मिळवल्याने मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे बोलले जात आहे. मात्र यामुळे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्रि‍पदाबाबत जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठिंबा असेल, अशी भूमिका जाहीर केली. यामुळे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा झाला. काल अमित शाह यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र अद्याप भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

आता महायुती सरकारचा शपथविधी सोहळा नेमका कुठे पार पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुती सरकारचा शपथविधी कुठे होणार? याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे. मुहायुतीचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबरला आझाद मैदानात पार पडणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच शिवाजी पार्क रेसकोर्स, ब्रेबॉर्न स्टेडियम आणि राजभवन या पर्यायांची देखील चाचपणी केली जात आहे. राजशिष्टाचार विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी शिवाजी पार्कची पाहणी केल्याची माहिती समोर आली होती. 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीत कुठलाही अडथळा न येता शिवाजी पार्कवरच शपथविधी करण्यावर भर देण्यात येत होता. तसेच वानखेडे स्टेडियमवर क्रिकेट सामने सुरू असल्याने इतर ठिकाणांचीदेखील चाचपणी सुरू होती. मात्र आता आझाद मैदानात महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडेल, अशी माहिती मिळत आहे.

Yogesh Pedhambkar
Author: Yogesh Pedhambkar

योगेश पेढांबकर - रत्नागिरी वार्ताहर, चिपळूण-संगमेश्वर, डिजीटल मिडिया प्रतिनिधी

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह *रत्नागिरी (प्रतिनिधी): निलेश रहाटे घाटीवळे ग्रामपंचायतीच्या...
Read More
घाटीवळे ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार; चौकशी अहवाल तब्बल १६ महिन्यांनी, तोही कथित खोट्या कागदपत्रांसह

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात विक्रांतदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामस्थांना झाडे वाटप; पुढील वर्षी झाडांची...
Read More
स्व.बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दी वर्षानिमित्त पाचेरी आगर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक   राजापूर - संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील  जैतापूर परिसरातील नागरिकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या...
Read More
पावसाळ्यापूर्वी डॉक्टर पद भरा; जैतापूरवासीयांची प्रशासनाकडे आर्त हाक

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन   युवा गझलकारांचा राष्ट्रीय मेळावा; भीमराव पांचाळे यांना जीवनगौरव, विशाल मोहितेंना युवा...
Read More
मुंबईत रंगणार पहिले अखिल भारतीय युवा गझल संमेलन

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल  राजापूर -संदीप शेमणकर राजापूर तालुक्यातील मौजे हातिवले गावची...
Read More
जिद्द, मेहनत आणि चिकाटीचे फळ; हातिवलेची सोनल आरेकर मुंबई पोलीस दलात कॉन्स्टेबल 

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा राजापूर - संदीप शेमणकर  बदलत्या काळासोबत जुन्या,...
Read More
कुणबी समाजासमोर आदर्शवत संदेश  वडिलांच्या तेराव्या दिवशी वृक्षारोपण; बंडबे कुटुंबाने पाडला नवा पायंडा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा यू गुहागर - युवा कार्यक्रम एवम खेल मंत्रालय भारत...
Read More
मेरा युवा भारत रत्नागिरी यांचे मार्फत जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात! *रत्नागिरी/ राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) दोन वेगवेगळ्या कारवाया...
Read More
लाचखोरांवर कारवाईचा बडगा; चिपळुणात डॉक्टर तर धुळ्यात पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात!

धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

 धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय **पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत शिवसेना (उबाठा)...
Read More
धक्कादायक: रत्नागिरीचे माजी आमदार बाळ माने यांची शिवसेनेतून हकालपट्टी; उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी

लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी   बेणी बुद्रुकच्या कुसुममळेवाडीत मध्यरात्रीची घटना; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण,...
Read More
लांज्यात बिबट्याचा थरारक हल्ला; घरात घुसून ५२ वर्षीय व्यक्तीसह युवक जखमी