श्रमिक क्रीडा मैदानावर,गं. द. आंबेकर चषक भव्य कबड्डी महोत्सव

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

९ डिसेंबर पासून श्रमिक क्रीडा मैदानावर गं. द. आंबेकर चषक भव्य कबड्डी महोत्सव

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने कबड्डीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ना. म. जोशी मार्गावरील श्रमिक जिमखाना येथे गं. द. आंबेकर स्मृती प्रित्यर्थ ९ डिसेंबर पासून व्यवसायिक पुरुष अ गट, स्थानिक पुरुष अ गट आणि महिला गटाच्या स्पर्धांना, संध्याकाळी ६ वाजल्यापासून आरंभ होत आहे.

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांच्या पुढाकाराने गेल्या ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून हा क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. यंदाच्या कबड्डीच्या तीन विभागात खेळविल्या जाणार्‍या सामान्यांमध्ये सुमारे ४८ नामवंत संघ खेळणार आहेत. क्रीडा महोत्सवात रसिकांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, प्रो-कबड्डीतील डावखुर्‍या खेळाडूंचा रंजक खेळ पाहावयाला मिळणार आहे. क्रीडा सामने ९,१०,११ डिसेंबर तर अंतिम सामने त्याच क्रीडांगणावर १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता पार पडतील.

आंबेकर शुटिंग बॉल स्पर्धा

गं. द. आंबेकर राज्यस्तरीय शुटिंग बॉल स्पर्धा श्रमिक जिमखाना येथे ८ डिसेंबर पासून दिवसभर होतील. जवळपास २४ नामवंत संघ या क्रीडा महोत्सवात उतरतील आणि सर्व सामने बाद‌ पध्दतीने खेळविले जातील. मुंबई शुटिंग बॉल असोसिएशनचे अध्यक्ष माजी आमदार श्याम सावंत, सरचिटणीस दीपक सावंत, संघटक अशोक चव्हाण या स्पर्धांचे व्यवस्थापन पहाणार आहेत. क्रीडा प्रमुख उपाध्यक्ष सुनिल बोरकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व स्पर्धा पार पडत आहेत. खजिनदार निवृत्ती देसाई, उपाध्यक्ष रघुनाथ आण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सेक्रेटरी शिवाजी काळे‌ आणि सर्व संघटन‌ सेक्रेटरी तसेच प्रकाश भोसले, अनिल पाटील आदी हा क्रीडा महोत्सव यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी मेहनत घेत आहेत.

येत्या ७ डिसेंबर पासून राष्ट्रीय मिल मजदूर संघ‌ येथे शालेय १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी, आयडियल स्पोर्ट क्लब अकादमीच्या सहकार्याने लिलाधर चव्हाण यांच्या व्यवस्थापनाखाली भव्य बुध्दिबळ स्पर्धा पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या बुध्दिबळ स्पर्धा या क्रीडा महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे, असे प्रसिध्दी प्रमुख काशिनाथ माटल यांनी कळवले आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

‘जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा ८० केंद्रीय कायद्यांतील १००० हून अधिक गुन्हे डिक्रिमिनलाइज;...
Read More
जन विश्वास कायदा’ लागू; किरकोळ गुन्ह्यांवर तुरुंगाऐवजी दंड – नागरिकांना मोठा दिलासा

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) वयाची...
Read More
सेवानिवृत्ती निमित्त संतोष पालशेतकर यांचा आबलोली येथे गुहागर तालुका चर्मकार समाजाच्या वतीने सत्कार सोहळा उत्साहात संपन्न

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या आयपीएल २०२६ च्या ९व्या...
Read More
जुरेल–बिश्नोईचा डबल धमाका; राजस्थानचा गुजरातवर ६ धावांनी थरारक विजय

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका सर्व नियामक नियमांचे काटेकोर पालन आणि अत्याधुनिक 'क्लोज्ड-लूप' प्रणालीचा...
Read More
लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिकचा प्रकल्प पर्यावरणपूरक; कंपनीने स्पष्ट केली आपली भूमिका

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ - नाट्यलेखन स्पर्धा मुंबई : नवोदित तसेच, प्रस्थापित लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्तीस व्यासपीठ मिळावे, मराठी नाट्यसंपदा अधिक...
Read More
लेखकांच्या सर्जनशील अभिव्यक्ती व्यासपीठ – नाट्यलेखन स्पर्धा

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): एम. ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे इंडियन प्रीमियर...
Read More
प्रियांश आर्याच्या स्फोटक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचा चेपॉकवर थरारक विजय

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार रत्नागिरीत बागायतदारांचा एल्गार; ४ एप्रिलला देवगडमध्ये होणाऱ्या...
Read More
आंबा-काजू उत्पादक आक्रमक! हेक्टरी २२ हजारांची मदत नाकारली; राजू शेट्टींच्या नेतृत्वाखाली मुंबईत धडकणार

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): , ईडन गार्डन्स, कोलकाता...
Read More
ईडन गार्डन्सवर हैदराबादचा विजय; नितीश कुमार रेड्डीच्या अष्टपैलू खेळीने कोलकात्यावर ६५ धावांनी मात

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश अधिकारी घडविण्याची परंपरा कायम आबलोली (संदेश कदम) चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार...
Read More
शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेमध्ये दैदीप्यमान यश

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह रत्नागिरी :- निलेश रहाटे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग हयांचे ऑगस्ट...
Read More
लाखो रुपयांचे CCTV ठप्प; ZP शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह