जैतापूरचे गावचे सुपुत्र श्री.संजय माजरेकर यांना सेंचुरी रेयॉन कंपनीत विशेष सन्मान

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

जैतापूरचे गावचे सुपुत्र श्री.संजय माजरेकर यांना सेंचुरी रेयॉन कंपनीत विशेष सन्मान

राजू सागवेकर :- राजापूर

▪️ जैतापूर गावचे सुपुत्र संजय माजरेकर यांनी आपल्या कर्तव्यनिष्ठ आणि निःस्वार्थ सेवेमुळे मोठा सन्मान मिळवला आहे. सेंचुरी रेयॉन किंवा बिर्ला समूहात 35 वर्षे प्रदीर्घ सेवा केल्यानंतर, त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी कंपनीच्या भव्य प्रांगणात ध्वजरोहणाचा मान देण्यात आला. त्यांच्या या विशेष सन्मानामुळे संपूर्ण कुटुंब आणि गावात आनंदाचे वातावरण आहे.

▪️ संजय माजरेकर यांनी आपल्या मेहनत, प्रामाणिकपणा आणि कामावरील निष्ठेमुळे हा सन्मान मिळवला आहे. हजारो कामगारांमध्ये त्यांच्या ज्येष्ठतेची ओळख राखत त्यांनी संस्थेसाठी दिलेल्या योगदानाची ही मोठी पोचपावती आहे. आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रती आदर, कामावरील निष्ठा आणि सेवा भावनेमुळे ते सर्वांसाठी आदर्श ठरले आहेत.

▪️ कारखाना सुरळीत चालू राहावा, उत्पादन वेळेवर पूर्ण व्हावे, कंटेनर वेळेवर पोहोचावे यासाठी त्यांनी अनेक बलिदाने दिली. वैयक्तिक जीवन, सण-समारंभ यांना दुय्यम स्थान देत आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. काही वेळा टीका सहन करावी लागली तरीही त्यांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य दिले. त्यांच्या या समर्पित सेवेमुळेच आज त्यांना हा मोठा सन्मान मिळाला आहे.

▪️ या विशेष गौरवाबद्दल त्यांच्या कुटुंबीयांनी, सहकाऱ्यांनी आणि संपूर्ण जैतापूर गावाने त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील कार्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देत, भविष्यातही ते असाच नवा आदर्श निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक   अकोला :...
Read More
अकोल्यात घरगुती गॅस समस्येमुळे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंचाचा मृत्यु ; पुणे- पिंपरी चिंचवडमध्ये तातडीचे नियोजन आवश्यक

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी - सुजात आंबेडकर   मुंबई : मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण...
Read More
ठाकरे कुटुंबाला मराठी भाषेची ठेकेदारी दिली कोणी – सुजात आंबेडकर

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): महाराजा यादविंद्रसिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीग...
Read More
कूपर कॉनॉलीच्या दमदार अर्धशतकावर पंजाब किंग्सची थरारक मात

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आबलोली (संदेश कदम)  गुहागर तालुक्यातील जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवा...
Read More
जामसुत जांभुर्णेवाडी येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

रत्नागिरीत धाडसी 'मिडनाईट ऑपरेशन'; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई रत्नागिरी (प्रतिनिधी): राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश...
Read More
रत्नागिरीत धाडसी ‘मिडनाईट ऑपरेशन’; एलईडी मासेमारी करणाऱ्या ३ नौकांवर कडक कारवाई

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न पुणे (गुरुदत्त वाकदेकर): तितिक्षा भावार्थ सेवा, पुणे आयोजित स्व. यशवंत...
Read More
भारत इतिहास संशोधक मंडळात तितिक्षा यशवंत गौरव पुरस्कार सोहळा संपन्न

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू - वर मेळावा आयोजन . रत्नागिरी, दि. २९ मार्च (वार्ताहर) : रत्नागिरी तालुका भंडारी समाज...
Read More
रत्नागिरी भंडारी समाज तर्फे वधू – वर मेळावा आयोजन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन रत्नागिरी - संदीप शेमणकर  (शिवार आंबेरे) श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी...
Read More
फिनोलेक्स कंपनीच्या सहकार्याने बांधलेल्या सुसज्ज स्वच्छतागृहाचे उद्घाटन

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बारसापारा क्रिकेट स्टेडियम येथे इंडियन प्रीमियर लीगच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात...
Read More
वैभव सूर्यवंशीच्या वादळी अर्धशतकाने राजस्थानचा दणदणीत विजय

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार

मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार राहुल अरुणोदय बॅनर्जीचं वयाच्या ४२ व्या वर्षी...
Read More
मनोरंजन विश्वावर शोककळा! प्रसिद्ध अभिनेत्याचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू; शूटिंग संपल्यानंतर घडला थरार