मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ-नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडले जाणार

नवी मुंबई (मंगेश जाधव)…..

 

मुंबई:- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर राज्यातील विकासकामांना वेग देण्यास सुरूवात केली आहे. मुंबई आणि नवी मुंबईसह संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात अखंड कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे निर्णय घेतले गेले आहेत. यामध्ये मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या दोन प्रमुख विमानतळांना मेट्रो मार्ग ८ (सीएसएमआयए ते एनएमआयए) ने जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित करण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे. या प्रकल्पाच्या सुसाध्यता अहवालाची तयारी सिडकोमार्फत केली जाईल. यासाठी प्रकल्प अहवाल सिडकोने तयार करावा, असे निर्देश एमएमआरडीएला देण्यात आले आहेत.

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या विमानतळांच्या आजूबाजूला प्रमुख आर्थिक केंद्रांचा विकास होत आहे. भविष्यात या भागात आंतरजोडणीची आवश्यकता अधिक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे या विमानतळांमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी तसेच येथील रस्ते व रेल्वे जाळ्याचे सुधारणा करण्यासाठी मेट्रो मार्ग ८ हा महत्त्वपूर्ण ठरेल.

मुंबई मेट्रो मार्ग ८ ची लांबी बहुसंख्येने नवी मुंबई परिसरातून जाईल आणि नवी मुंबई विमानतळ सिडकोमार्फत विकसित होणार आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. शासनाच्या मंजुरीसाठी संबंधित प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश सिडकोला देण्यात आले आहेत. या मेट्रो मार्गामुळे मुंबई महानगर क्षेत्राच्या कनेक्टिव्हिटीमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा होईल आणि भविष्यातील प्रवाशांच्या प्रवासाची सोय अधिक सुलभ होईल.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...