शृंगारतळीत विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर
बळीवंश कुणबी फाउंडेशन,गुहागरचा स्तुत्य उपक्रम
गुहागर (आशिष करदेकर)
बळीवंश कुणबी फाऊंडेशन,गुहागर यांच्यावतीने नुकतेच विद्यार्थी मार्गदर्शन शिबिर पाटपन्हाळे ग्रामपंचायत सभागृहात पार पडले.बळीवंश कुणबी फाऊंडेशन,गुहागर यांच्यावतीने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बळीवंश कुणबी फाऊंडेशन गेले काही दिवस सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आहे.स्पर्धा परीक्षांच्या वाचनालयाच्या निधी संकलनासाठी बळीवंश कुणबी फाऊंडेशन गुहागर याची उभारणी करण्यात आली आहे.पहिल्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने हा विद्यार्थी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.यापूर्वी नाट्यप्रयोगाच्या माध्यमातून देखील निधी संकलन करण्यासाठी उपक्रम राबविण्यात आला.या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरासाठी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रा.सुनील देवरे यांनी उपस्थित विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन केले.यावेळी शिक्षक वर्ग तसेच बळीवंश कुणबी फाऊंडेशन गुहागरचे पदाधिकारी उपस्थित होते.