आंगवलीतील जनता विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न

देवरूख–(वार्ताहर) संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील जनता विद्यालयात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शालेय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. ध्वज फडकावून झाल्यावर या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन नियामक मंडळ आंगवली चे अध्यक्ष मा. श्री. अशोकभाई अणेराव यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे पदाधिकारी मा.श्री. अरूण भाई अणेराव तसेच गावाच्या सरपंच मा. सौ. अरुणा अणेराव त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.श्री. अजित चव्हाण सर, सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी देखील उपस्थित होते. या प्रदर्शनात शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या प्रदर्शनात ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीम, टेस्ला कॉइल, लेझर सिक्युरीटी सिस्टीम, एरो रॉकेट, ओसिलेशन वेव, जंगल व्यवस्थापन, शेती व्यवस्थापन, शैक्षणिक साहित्य यांसारख्या विविध प्रकारचे विज्ञान मॉडेल विद्यार्थ्यांनी बनविले होते. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून श्री. चव्हाण सर व विज्ञान शिक्षक श्री. सुरज जाधव सर तसेच शाळेतील सर्व शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल आत्मीयता वाढावी असे शाळेचे मुख्याध्यापक श्री. चव्हाण सर यांनी सांगितले. या प्रदर्शनाचा लाभ पालक , शिक्षक व विद्यार्थ्यांनी घेतला.