राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड

चिपळूण :(वार्ताहर)

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील पूर्वी मादगे, दुर्वा शिगवण, तन्वी गुडेकर, सार्थक गुडेकर, श्रवण गुडेकर, स्वराज गुडेकर असे सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मीना विचारे मॅडम ची निवड झाली.
हा अभ्यास दौरा दि. ०७/०२/२०२५ ते १०/०२/२०२५ अखेर कर्नाटक राज्यात असून विश्वेश्वरैया म्युजियम, विमान म्युजियम, वृंदावन गार्डन, मैसूर पॅलेस तसेच टिपू सुलतान पॅलेस असा असणार आहे.

विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन मीना विचारे, दत्तात्रेय नार्वेकर, विद्या कसबेकर तसेच रवींद्र घाणेकर या शिक्षकां कडून वेळोवेळी उत्तम प्रकारे लाभत आहे.

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड

शाळेची उत्तम कामगिरी असून शा. व्य. स. अध्यक्ष निलेश डिके, उपाध्यक्ष अंकिता गुडेकर, शिक्षण तज्ञ सदस्य श्रीराम घाणेकर, सरपंच सोनू धुमक, उप सरपंच संजय मादगे तसेच इतर सदस्य आणि ग्रामस्थांनी दौऱ्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि मुख्याध्यापिकेला शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रीय अविष्कार अभियानांतर्गत राज्या बाहेर शालेय अभ्यास दौऱ्यासाठी चिपळूण तालुक्यातील मांडकी खूर्द शाळेतील विद्यार्थी तसेच मुख्याध्यापकांची निवड

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ पत्रकार - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

Leave a Comment

आणखी वाचा...