माहेरवाशीण ची पाठराखीण तवसाळ पंचक्रोशीची श्री देवी महामाई सोनसाखळी ……..
■ तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा व ऐतिहासिक देवस्थान श्री महामाई सोनसाखळी देवी मंदिर कलशारोहन सोहळा…
■ कार्यक्रम शुक्रवार १४ फेब्रुवारी २०२५ ते १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत साजरा करण्यात येत आहे .
सर्व भक्तगंनाणी या सर्व कार्यक्रमास आपल्या माहेरवाशीण, कुटुंबीय मित्रपरिवार व सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि श्री देवी महामाई सोनसाखळी च्या दर्शन , महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष श्री.मोहन यशवंत गडदे यांनी केले आहे.
???? संपूर्ण कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका सोबत मंदिराचे फोटो ????

गुहागर– तालुक्यातील तवसाळ पंचक्रोशी ची श्रद्धा स्थान असणारी आणि समग्र माहेरवाशिणी ची पाठीराखी आणि सर्वसामन्यांच्या हाकेला त्यांच्या नवसाला पावणारी प्राचीन आणि ऐतिहासिक देवता म्हणजे श्री देवी महामाई सोनसाखळी…
या देवीच्या नूतन मंदिरा चा कलशा रोहण सोहळा पार पाडत आहे. या उत्सवनिमित्त पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण सुरू आहे . श्री देवी महा माई सोनसाखळी ट्रस्ट चे वतीनं या संपूर्ण उत्सवाची सूत्रबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे.
माहेरवाशीण ची पाठराखीण तवसाळ पंचक्रोशीची श्री देवी महामाई सोनसाखळी…
गेले अनेक वर्ष इथल्या भक्तांनी पाहिलेलं नेत्रदीपक अशा नूतन मंदिरा च स्वप्न आज पूर्ण होत आहे. मुळातच तवसाळ रोहेले बीच चे समुद्र किनाऱ्या हून जाणाऱ्या रस्त्या लगत निसर्गाच्या कोंदणात चारी बाजूच्या हिरव्यागार वनराई मध्ये विराजमान असणाऱ्या देवी च मंदिर आता अनेक पर्यटकांचं आकर्षण केंद्र बनत आहेत. अनेक श्रद्धाळू आपले व्यथा,भीती, अडचणी घेऊन देवी कडे येत असतात आणि जाताना एका आत्मिक समाधानाने डोळ्यातील आनंदाश्रू लपवत निश्चिंत होऊन जात आहेत, जणू काही त्यांची पूर्ण जबाबदारी आता श्री देवी महामाई सोनसाखळी देवी ने घेतली आहे या विश्वासावर च.
रत्नागिरी जिल्ह्यातील जी काही मानाची २७ ग्रामदेवता आणि देवस्थान आहेत ज्यांना १०० वर्ष पूर्वी ब्रिटिश सरकारने ही या देवतांच्या अस्तित्वाची प्रचिती आल्याने त्यांना मानाचं ताम्रपट ( सनद) दिली आहेत त्या देवस्थान पैकी आमची श्री देवी महामाई सोनसाखळी देवी हे आज अभिमानाने उल्लेख करावा लागेलं.
⭕ श्री देवी महामाई सोनसाखळी देवी ची पालखी डाउनलोड साठी ????
श्री देवी महा माई सोनसाखळी देवी चे नूतन मंदिराच्या कलाशारोहण सोहळ्याला येणाऱ्या सर्व भाविकांचे मी रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र आणि RV News या यूट्यूब वाहिनी तर्फे हार्दिक स्वागत करतो.
???? आई श्री देवी महामाई सोनसाखळी, श्री देव रवळनाथ, श्री देवी त्रिमूर्ती – सोमजाय आपणाला उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना.????
पिढ्यानपिढ्या चा वारसा आणि तुझी मंगलदृष्टी अशीच लाभू दे. आम्हास हेच तुझ्या उंबरठयापाशी नतमस्तक ????
सुजेंद्र सुर्वे – संपादक
???? कोंकणातील ग्रामदैवत इतिहास….
ग्रामदेवातांचा इतिहास फार रंजक आणि उद्बोधक आहे. संशोधकांचा मते ग्रामदेवता या स्वयंभू स्वरुपात अस्तित्वात आल्या,त्यांची उत्पत्ती हि लोकवस्ती पासून दूर अश्या जंगलात झाली.आपल्या कडे ग्रामदेवतांचे स्थान आज हि जंगलात आढळते .
प्रथम या देवतांची पूजा आर्चा त्या प्रदेशातील मूळ रहिवाशी करीत असत.देवताना रंग,आकार,रूप, असे काही निश्चित नव्हते.काही ठिकाणी साधा दगड वा झाडाची डोली,झाडांचा बुन्धात असलेल्या खोबणीत,तर काही ठिकाणी नुसताच दगडांचा गडगा,असे काही रूप असे.या देवतांची पूजा पुष्प,वाद्ध,बळी अशा प्रचलित पद्धतीने चालत असत.दुष्ट व सुष्ट दोन्ही शक्ती तांचे ठायी एकवटल्या ने त्यांचा पूजे मागे भय ,भीती असी भावना असे.या देवता बहुत करून देवी असत.या देवतां बद्दल मानवाच्या मनात कायम गूढ भीती असे,कालांतराने हि देवते उच्च वर्नियांस पण आकर्षक वाटू लागल्याने त्यांची उपासना ते करू लागले.मात्र प्राचीन संस्कृती बदलल्यामुळे (आर्यांचे आगमन) उपासनेत बदल घडून वैदिक ,शैव अशा उच्च वर्नियाचा पूजाविधी नुसार पूजा होऊ लागली.देवताना प्रतिष्ठा मिळून आर्यांचा सांस्कृतिक प्रगतीचा प्रभाव पडून देवताना विशिष्ठ आकार म्हणझे मूर्त रूप मिळून पाषाण मूर्तींमध्ये रूपांतर झाले.
मग प्रचलित संस्कृती प्रमाणे देवालयात त्यांची प्राण प्रतिष्ठा होऊन यथा साग पूजा होऊ लागली.
काही ग्राम देवता पृथ्वी तत्वाच्या होत्या,म्हणजे श्री भवानी,श्री अंबाबाई,श्री रेणुकामाता,यांना तर कुलदेवतांचा मन मिळाला. त्या तर घराघरातून ,देव्हाऱ्यात बसावून पूजल्या जाऊ लागल्या.त्यांना आदी शक्ती,आदी माया संबोधण्यात येऊ लागले.शक्ती पीठाचे महत्व प्राप्त झाले.त्यांची मूळ रूपे ग्राम देवतांची होती,तरी त्या इतक्या लोकप्रिय झाल्या कि त्यांनी देव्हाऱ्यातच स्थान मिळविले.
निसर्गाच्या सानिद्धात मानव प्राणी राहत असता,त्याला भोगाव्या लागणाऱ्या यातना,ओढवणाऱ्या आपत्तीचे भय,जीवनाची अनिश्चितता,जनावरे ,पंच महाभूतांचे भय या सर्वा पासून रक्षण करण्यासाठीत्याला कायम एखाध्या भक्कम मानसिक आधाराची गरज होती.सर्व आपत्ती,जन्म-मृत्यू या मधील संघर्ष यात रक्षण करण्यासाठी धेर्य दिले ते या सर्व शक्तिमान देवतानीच ,त्याला खरोखरच आधार दिला व त्याचे जीवन सुसह्य केले हे मात्र निश्चित.