रत्नागिरी जिल्ह्यातील उबाठा ला धक्का? तीन माजी आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर ?

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी जिल्ह्यातील उबाठा ला धक्का? तीन माजी आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर ?

रत्नागिरी (वार्ताहर) – जिल्ह्यातील उबाठा शिवसेनेचे तीन माजी आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असल्याची जोरदार चर्चा सुरु असतानाच उबाठा शिवसेनेच्या जिल्ह्यातील संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सुभाष बने आणि राजापूर विधानसभाचे माजी आमदार गणपत कदम यांनी उद्योग मंत्री उदय सामंत याचेसह ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतल्याने त्यांचेसह राजापूरचे पराभूत उमेदवार व उबाठा शिवसेनेचे नेते राजन साळवी हे भाजपात न जाता प्रमुख कार्यकर्ते यांच्या आग्रही भूमिके मुळे लवकरच शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश करणार असल्याचे ही वृत्त आहे.

गणपत कदम व सुभाष बने यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने पक्ष प्रवेशाला दुजोरा मिळाला असल्याची चर्चाला सुरु आहे. तसेच लांजा राजापूरचे माजी आमदार राजन साळवी ही आँपरेशन टायगर अंतर्गत लवकरच शिंदे गटात सहभागी होणार आहेत.

भाजपचे खासदार नारायण राणे यांचे कट्टर समर्थक असलेले सुभाष बने आणि गणपत कदम यांनी नारायण राणेंबरोबर काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र कालांतराने काँग्रेसमधून नारायण राणे यांची साथ सोडून माजी आमदार सुभाष बने आणि गणपत कदम यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे माजी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मोठा राजकीय धक्का बसला होता.

निवडणुकीत सुभाष बनेंचा संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ 2009मधे फेररचनेत विभागला गेला, तर गणपत कदम पराभूत झाले. त्यानंतर काँग्रेसमधे नाराज झालेल्या सुभाष बने आणि गणपत कदम यांना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वगृही प्रवेश दिला होता. गेली काही वर्षे शिवसेनेत असलेले माजी आम. सुभाष बने यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पुत्र व माजी जिप अध्यक्ष रोहन बने याला उमेदवारी मिळावी म्हणून मागणी लावून धरली होती. त्याला पक्ष प्रमुख व माजी खासदार विनायक राऊत यांनी शब्द देवून ही प्रतिसाद न

दील्याने आता ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत..

हा पक्ष प्रवेश लवकरच होणार असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सुतोवाच केले होते.त्यास शिंदे यांच्या भेटीनंतर शिक्कामोर्तब झालेची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर शिवसेनेचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील उबाठा ला धक्का? तीन माजी आमदार शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर ?

रत्नागिरी जिल्ह्यात आँपरेशन टायगर यशस्वी होण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून ठाकरे गटाला वारंवार धक्के देण्यात येत आहेत. नुकतेच ठाकरे गटाचे रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर विधानसभा मतदारसंघ सोडल्यास अन्य मतदार संघातील अनेक पदाधिकारी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिंन्दे गटात प्रवेश करू लागल्याने ठाकरे गटाचे बुरुज ढासळू लागले आहेत.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : स्वामी (सोशल वर्कर्स असोसिएशन फॉर मेडिकल, एज्युकेशन अ‍ॅण्ड एन्व्हायर्नमेंट)...
Read More
ज्येष्ठ नागरिकांची भव्य गायन स्पर्धा उत्साहात संपन्न

रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

■ रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा* -  आमदार किरण ( भैय्या) सामंत ■ कोणतेही संविधानिक...
Read More
रिफायनरी विषय संपलेला,विरोधकांनी आपल्या फायद्यासाठी निवडणुकीतील हे तुणतुणे बंद करा-  आमदार किरण ( भैय्या) सामंत

गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

  गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत...
Read More
गुहागर तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा उद्धव ठाकरे शिवसेना–मनसे युतीला जाहीर पाठिंबा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा हातखंबा गटातील बंडखोरीवर पक्षाची कारवाई, युवासेनेतही बदल रत्नागिरी | प्रतिनिधी...
Read More
परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी; मुन्ना देसाई यांचा पदाचा राजीनामा

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव   मोहनवाडी | प्रतिनिधी नंदकुमार बागडेपाटील  दिनांक ३१ जानेवारी...
Read More
एस. एस. इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ‘विज्ञान प्रदर्शन’ : प्रयोगातून विज्ञानाचा अनुभव

कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

🔥 कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा! माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा गुहागर | प्रतिनिधी...
Read More
कुडलीतून महायुतीला उस्फूर्त पाठिंबा!  माजी सरपंच वसंत किल्लेकरांचा मोठा निर्णय; युतीच्या दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन जैतापूर | वार्ताहर : राजापूर तालुक्यातील दळे-जैतापूर येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ...
Read More
तालुक्यातील दळे येथील सामाजिक कार्यकर्ते शरफुद्दीन काझी यांचे निधन

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)...
Read More
शाश्वत शेती, महिला सक्षमीकरण आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकटीकरणासाठी गोदरेज ॲग्रोव्हेटसोबतचा करार महत्त्वपूर्ण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

डोंबिवलीत 'लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी'चा थरार; 'तनुजा ११ आबलोली' ठरला महाविजेता! संदेश दादा काताळकर यांच्या वाढदिवसानिमित्त गुहागर तालुक्यातील खेळाडूंसाठी भव्य आयोजन...
Read More
डोंबिवलीत ‘लिजेंड्स मास्टर्स ट्रॉफी’चा थरार; ‘तनुजा ११ आबलोली’ ठरला महाविजेता!

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी

करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी   मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : कॉस्मोपॉलिटन संस्थेच्या वालिया...
Read More
करमणूक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम आवश्यक – सिने कलावंत अशोक कुलकर्णी
Play sound