मासु ग्रामपंचायत ईमारत बाबत, मासू ग्रामस्थांचे पुन्हा आमरण उपोषण..
???? गूहागर पंचायती समोर उद्या करणारं उपोषण …
???? गुहागर गटविकास अधिकारी आणि कार्यकारी अधिकारी रत्नागिरी, हे जाणून बुजून कायद्याची पायमल्ली करत आहेत.
???? इमारतीचा खोटा प्रस्ताव सादर करून व शासनाचे लाखो रुपये चुकीच्या पद्धतीने वापरल्याने सबंधित यांचेवर फौजदारी गून्हे दाखल करावेत….- ग्रामस्थ
गुहागर ( वार्ताहर) – तालुक्यातील मासू ग्रामपंचायत ची पूर्वी ची ईमारत सुस्थितीत असताना ती पाडून चुकीच्या पद्धतीने नवीन बांधकाम सुरू असून त्या विरोधात मासूं येथील आनंद भोजने आणि ग्रामस्थ यांनी पुन्हा एकदा ११/०२/२०२५ पासुन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
श्री. आनंद भोजने आणि ग्रामस्थ यांनी गटविकास अधिकारी गुहागर आणि कार्यकारी अधिकारी रत्नागिरी हेच संबंधितांना पाठीशी घालत असून तेच कायद्याची पायमल्ली करत आहेत असे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,
गेली ४० वर्ष मासू गावच्या मध्यवर्ती व सर्व ग्रामस्थ यांचे सोयीचे असलेली ग्रामपंचायत सू स्थित असलेली पाडून विना परवाना प्रस्ताव असलेल्या कामावर सरकारने लाखो रुपये खर्च केले आहेत आणि ते सबंधित यांचेवर कारवाई करून झालेल्या पैशाच्या अपहार याची ही चौकशी व्हावी. असे ही त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.
मात्र अद्याप कोणतेही कारवाई गटविकास अधिकारी गुहागर यानी कारवाई सबंधित यांचेवर केली नाही. म्हणूनच पुन्हा एकदा गुहागर पंचायत समिती येथे मासू ग्रामस्थ हे उपोषणाला बसणार आहेत.
श्री. आनंद भोजने यांनी केलेल्या तक्रारीत खालील मुद्दे मांडले आहेत.????