रत्नागिरी जिल्ह्यात १४, १५ व १६ फेब्रुवारी रोजी, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांचे निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन.
रत्नागिरी – कोकण बोर्ड अव्वल स्थानावर असतो परंतु स्पर्धा परीक्षेत हे गुणवत्ताधारक विद्यार्थी अपेक्षित प्रमाणात दिसून येत नाहीत. बहुतेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती महागडे क्लासेस किंवा ॲकॅडमी लावण्याची नसते. अशा वेळेस शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव घडावे व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन निर्माण व्हावे यासाठी संपूर्ण कोकणात “तिमिरातूनी तेजाकडे” ही शैक्षणिक चळवळ यशस्वीरित्या राबवून प्रशासनात कोकणातील टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्नशील असणारे व आपल्या निशुल्क मार्गदर्शन व्याख्यानांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा, पुढील वाटचालीसाठी दिशादर्शक मार्गदर्शन करणारे, मा. श्री सत्यवान यशवंत रेडकर, कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार हे शुक्रवार, दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, विठ्ठल रखुमाई मंदिर, बाजारपेठ, रत्नागिरी त्याचप्रमाणे शनिवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी, सकाळी ८.०० वाजता, जी एम शेट्ये हायस्कूल, बसणी व सकाळी १०.३० वाजता, रा.भा.शिर्के प्रशाला, रत्नागिरी त्याचप्रमाणे खेड तालुक्यात रविवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता ज्ञानदीप विद्या मंदिर – भडगाव खोंडे या ठिकाणी विद्यार्थ्यांना (३१४-३१७वे) निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान देणार आहेत. संबंधित शैक्षणिक संकुलात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी व आसपासच्या परिसरातील इच्छुक विद्यार्थ्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.