अंधेरी पूर्व येथे महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात साजरा
नवी मुंबई (मंगेश जाधव)
अंधेरी पूर्व येथील सहार गाव, सावित्रीबाई फुले नगरातील विश्वशांती बुध्द विहार या ठिकाणी बौध्दजन पंचायत समिती शाखा क्र. ६५७ अंतर्गत विश्वदिप महिला मंडळ यांच्या विद्यमाने नुकताच महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम विश्वदिप महिला मंडळ यांच्या अध्यक्षा प्रतिक्षा प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते डॉ . बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला पुष्प वाहण्यात आले. त्यानंतर माता सावित्रीबाई फुले, माता भीमाई, माता रमाई, या महामातांच्या फोटोंना पुष्पहार वाहून दिप प्रज्वलन करण्यात आले. सदर वेळी उपस्थित उपासक आणि उपासिका यांनी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली.
महामातांच्या जयंती निमित्त त्यांच्या जीवनावर शाखेच्या रमीता यादव, अंतरा जाधव, अपर्णा पवार, प्रतिक्षा पवार यांनी प्रबोधनात्म भाषण करून महामातांचा खडतर आणि संघर्षमय जीवनप्रवास उलघडला. त्याच प्रमाणे परिसरातील गटाच्या इतर शाखांमधून आलेल्या महिलांनी देखील यावेळी आपले विचार मांडून महामातांचा संयुक्त जयंतीच्या शूभेच्छा दिल्या . यावेळी बौध्दाचार्य नारायण जाधव यांनी मुलगी जन्माला का यावी आणि ती कुटुंब, समाज आणि देशाचा सन्मान कशी करते हे महत्व पटवून देणारी भावनिक कविता सादर केली. तसेच बौध्दाचाऱ्या प्रतिभा मोहीते , विश्वास सावंत यांनी शुभेच्छा दिल्या. सदर वेळी शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार यांनी देखील महामातां संदर्भात आपले अनमोल विचार मांडले . .
कार्यक्रमा निमित्त पत्रकार मेघना सुर्वे यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान पत्र देऊन महिला अध्यक्ष प्रतिक्षा पवार यांनी सन्मानित केले . तसेच गटाच्या इतर शाखांमधून आलेल्या सर्व महिलांचे व स्थानिक शाखा, कमिटी व तरुण मंडळ यांचे महिला मंडळ यांच्या कडून पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले .संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाही जवाबदारी सचिव रमीता यादव, अंतरा जाधव यांनी पार पडली . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वदिप महिला मंडळ यांच्या सर्वच पदाधिकारी व सभासद भगिनी यांनी मोलाचे सहकार्य केले.शेवटी शरणतय गाथा घेऊन आणि सर्व उपस्थितांना अल्पोपहार देउन कार्यक्रम संपन्न करण्यात आला .