श्रीधूतपापेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

श्रीधूतपापेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

राजापूर (प्रतिनिधी पुरुषोत्तम खांबल)
राजापूर तालुक्यातील असंख्य शिवभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या ऐतिहासिक भवानीशंकर श्रीधूतपापेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी ते शुक्रवार दिनांक 28 फेब्रुवारी पर्यंत पारंपरिक वाद्य, नित्यपूजा, श्रींवर रुद्राभिषेक, श्रींचा शयनकाल, गायन, कीर्तन, भोवती, नित्य आरती असे नित्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी महाशिवरात्रीच्या दिवशी नित्य पूजा, श्रींवर रुद्राभिषेक, विविध मंडळांचे भजनाचे कार्यक्रम, शिवस्वरांजली भक्तिभाव गीतांचा सुमधुर कार्यक्रम, बुवा श्री गजानन मनोहर पवार यांचे संगीत भजन, श्रींची महापूजा, महानैवेद्य, मंत्र पुष्पांजली, भोवती आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार १ मार्च २०२५ रोजी दुपारी १ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

२८ फेब्रुवारी रोजी आरती झाल्यानंतर श्री बजरंग नमन मंडळ खांबल वाडी यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

तरी या उत्सवानिमित्त सर्व शिवभक्तांनी सहभागी होऊन शिवोपासना करावी असे आवाहन श्री देव धुतपापेश्वर देवस्थानच्यावतीने करण्यात आले आहे.

Purushottam Khambal
Author: Purushottam Khambal

पुरुषोत्तम खंबल. ???? डिजिटल मिडिया प्रतिनिधि - राजापुर ???? धोपेश्वर, ता. राजापुर , जि.रत्नागिरी

  • AD-3

Leave a Comment

  • AD-3

आणखी वाचा...

  • AD-3