आदर्श प्राथमिक शाळा जानशीची विद्यार्थिनी भूमी आग्रे निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने चमकली

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

आदर्श प्राथमिक शाळा जानशीची विद्यार्थिनी भूमी आग्रे निबंध स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने चमकली

दिनेश कु्वेस्कर ( वार्ताहर )

राजापूर (मिठगवाने): शिवजयंतीनिमित्त मिठगवाने गावात आयोजित निबंध स्पर्धेत आदर्श प्राथमिक शाळा जानशी येथील विद्यार्थिनी भूमी आग्रे हिने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेचे नाव उज्जवल केले आहे.

भूमी आग्रे ही इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत असून, तिने छत्रपती शिवरायांच्या प्रेरणादायी चरित्रावर निबंध सादर केला होता. तिच्या या यशामागे मुख्याध्यापिका सौ. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या गौरवप्रसंगी निवेलीच्या सरपंच सौ. स्नेहा दिनेश कुवेस्कर, पालक-शिक्षक संघाच्या अध्यक्षा निधी आग्रे, पोलीस पाटील राजा तांबे, राजन धनावडे, तसेच ग्रामसेवक सचिन हातनकर यांनी तिचे विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

स्पर्धेमधील या उल्लेखनीय यशामुळे भूमीचे कुटुंब, शिक्षक आणि संपूर्ण गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Ratnagiri Office
Author: Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

bhaskr

Leave a Comment

आणखी वाचा...