गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण उद्घाटन सोहळा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न
गुहागर – जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित गुहागर तालुका शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण तिसरा टप्पा उद्घाटन सोहळा अत्यंत दिमाखदार व उत्साह पूर्ण वातावरणामध्ये संपन्न झाला.कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्र संचालक शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग श्री विश्वास खर्डे साहेब यांचे शुभहस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमापूजन यांनी झाले.
त्यावेळी विषय शिक्षक परमेश्वर लांडे ,विषय शिक्षक शिवानंद साखरे, तज्ञ मार्गदर्शक विजय पिसाळ, सुनील गुडेकर, रविकांत वाकडे, मनोज पाटील ,सुभाष रणे, दिलीप माणगावकर, प्रदीप जाधव, प्रदीप पाटील ,दीपक रामाने सर्व तज्ञ मार्गदर्शक सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी श्री चंद्रकांत पागडे ,उमेश चाफे, नार्वेकर मॅडम ,जगताप सर, आबलोली हायस्कूलचे श्री व्हनमाने सर ,गणेश कुलकर्णी ,रवींद्र कुळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री पिसाळ सर यांनी केले .त्यावेळी सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या वतीने आदर्श शिक्षक व उपक्रमशील शिक्षक श्री दिनेश जाक्कर तसेच गुहागर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री देव गोपाळ कृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या कर्तव्यदक्ष व कार्य तत्पर शिक्षिका सौ सुचिता ठाकूर मॅडम यांचा केंद्र संचालक शिक्षण विस्तार अधिकारी श्री विश्वास खर्डे साहेब यांचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत सन्मान करण्यात आला.
त्या त्यावेळी बोलताना केंद्र संचालक श्री विश्वास खर्डे साहेब म्हणाले की या टप्प्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार भारताला जागतिक ज्ञानसत्ता बनविण्याचे ध्येय आहे, 21 व्या शतकातील कौशल्य विद्यार्थ्यांनी अवगत करण्यासाठी व वैश्विक नागरिक घडविण्यासाठी सर्व शिक्षकानी कटिबद्ध राहावे ,क्षमता आधारित अध्ययन अध्यापन प्रक्रिया व बदललेली मूल्यमापन व मूल्यांकन प्रक्रिया समजावून घ्यावी व त्यानुसार कार्यवाही करण्यात यावी.180 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते सदरचे प्रशिक्षण हे शिक्षकांच्या क्षमता .
शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी सदरचे प्रशिक्षण खूपच उपयुक्त आहे, यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण गुणवत्ता विकास होण्यासाठी मदत होणार आहे .प्रशिक्षणार्थ्यानी उत्स्फूर्तपणे गटकार्य करावे व सादरीकरण करावे, प्रशिक्षणार्थ्यानी प्रशिक्षण कालावधीत शिस्त पाळावी व वेळेचे बंधन पाळावे.सदरचे प्रशिक्षण गटशिक्षणाधिकारी रायचंद गळवे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.
सर्व प्रशिक्षणार्थ्यांना स्टेशनरी व संदर्भ पुस्तकांचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मनोज पाटील यांनी केले .आभार प्रदर्शन श्री दीपक रामाने यांनी केले.