आबलोली (संदेश कदम)
गुहागर तालुक्यातील मु. पो. मासू येथील स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान मासू येथे महाशिवरात्रीचे औचित्य साधून बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी सालाबादप्रमाणे याही वर्षी “महाशिवरात्री उत्सव २०२५” या उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून विविध कार्यक्रमांनी हा उत्सव साजरा करण्यात येणार असून रात्रौ ठिक १०:०० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती “रंग भरु दे आमच्या गणा..! हे नाटक सादर होणार आहे. तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने या संपूर्ण उत्सवाचा, कार्यक्रमांचा आणि स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थानाचा दर्शनाचा लाभ घ्यावा असे जाहिर आवाहन स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान कमिटी मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
“महाशिवरात्री उत्सव २०२५’ निमित्ताने बुधवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान मासू येथे सकाळी १०:०० वाजता नित्यपूजा, सकाळी ०८:०० ते ०९:०० वाजता षडोपचारी पूजेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानंतर सकाळी ०९:०० ते १०:३० या वेळेत अभिषेक केला जाणार असून सकाळी ११:०० वाजता श्री. सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर दुपारी ०१:०० वाजता महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दुपारी ०२:०० ते ०४:०० या वेळेत सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सायंकाळी ०७:०० वाजता सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले असून रात्रौ ०८:३० वाजता स्थानिक ग्रामस्थांचा बहुरंगी बहुढंगी नमनाचा कार्यक्रम सादर होणार असून रात्रौ ठिक १०:०० वाजता रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात नावाजलेली नाट्यकृती रंग भरु दे आमच्या गणा..! हि विनोदी नाट्यकृती, नाटक सादर होणार आहे तरी मासू पंचक्रोशीतील जनतेने देवदर्शनाचा आणि या संपूर्ण कार्यक्रमाचा मोफत लाभ घ्यावा असे जाहीर आवाहन स्वयंभू श्री. सोमेश्वर देवस्थान कमिटी मासू गाव आणि मुंबई, ग्रामस्थ यांचे वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.