विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासावा …..धन्वंतरी मोरे
गुहागर – विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारून कार्यकारणभावाला महत्त्व द्यावे, प्रयोगशील वृत्ती अंगी असावी ,वैज्ञानिक साहित्याचे वाचन करावे असे प्रतिपादन वेलदूर नवानगर मराठी शाळेमध्ये संपन्न झालेल्या राष्ट्रीय विज्ञान दिन कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून धन्वंतरी मोरे यांनी केले.त्यावेळी वेलदूर ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर कोळथरकर, मुख्याध्यापक मनोज पाटील, शिक्षिका सुषमा गायकवाड ,अफसाना मुल्ला, संस्कार रोहीलकर ,अर्णवि नाटेकर, काव्या दाभोळकर, आर्या नाटेकर व सर्व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते .विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग याचे प्रात्यक्षिक केले.वैज्ञानिक प्रश्नमंजुषा कार्यक्रम संपन्न झाला.त्यावेळी तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर कोळथरकर ,मुख्याध्यापक मनोज पाटील यांनी मार्गदर्शन केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा गायकवाड तर सूत्रसंचालन अफसाना मोरे यांनी केले

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.