पुर्ये येथील युवा गायक अक्षय सुधाकर शिंदे याचे होळी रे होळी शिमगागीत प्रेक्षकांच्या भेटीला…
✍️भरत माने/साखरपा
कोकणकरांचे जिव्हाळ्याचे सण म्हणजे गणपती आणि शिमगा. प्रामुख्याने गणपती सण पार पडला कि वाट पाहिली जाते ती शिमग्याची. आता काही दिवसांवर शिमगा सण आलेला आहे. या धर्तीवर अल्पवधीत आपल्या सुमधुर आवाजाने नावलौकिक कमवलेला पुर्ये गावातील युवा गायक अक्षय सुधाकर शिंदे याचे “होळी रे होळी” हे शिमगागीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.शिमगा सणात आपल्या घरी गावचे ग्रामदैवत भेटीला येत असते. त्यामुळे भक्तांना, चाकरमान्यांना होणारा आनंद या गाण्यातून दाखवण्यात आला आहे.शिमगा आगमन धर्तीवर हे गाणे रिलीज होत आहे. पुर्ये गावाची ग्रामदैवत गंगादेवीच्या शिमगोतस्वातील क्षण यामध्ये पहायला मिळणार आहेत.
या गाण्याचे गीतकार गोपाळ करंडे,संगीतकार साहिल शिवगण नवलाई प्रोडक्शन,निर्मिती सुप्रसिद्ध कॅसिओ वादक शुभम मांडवकर हे आहेत. या सर्व दिग्गजकांनी एकत्र येत हे गाणे तयार केले आहे.प्रसिद्ध यू ट्यूब चॅनेल गोपाळ करंडे या चॅनेलवर हे गाणे रिलीज झाले आहे.
अक्षयला लहानपानापासून गाण्याची आवड होती व तेव्हापासून तो भजनामध्ये सहभागी व्हायचा त्यातून त्याला या कलेची गोडी निर्माण झाल्याचे त्याने सांगितले.या आधी सुद्धा दोन अल्बम सॉंग अक्षयने केली आहे. देवरुख ओझंरे खुर्द कुळयेवाडी नमन यामध्ये शाहिराचे काम तो करतो. यंदाच्या गणपती मध्ये हे मोरया गाण्यात सुद्धा आपला आवाज सर्वांपर्यंत पोहचवला होता. संगीत क्षेत्रातील आवड आणि करियर म्हणून अक्षय याकडे पाहत आहे. यापुढे सुद्धा जास्तीस्त गाणी तयार व्हावीत, आवाज सर्वांसमोर पोचावा, पुर्ये गावाचे नाव मोठं व्हावे असा आशावाद त्याने यावेळी व्यक्त केला. सध्या त्याने आपल्या मित्रांना एकत्र करीत साई रिमिक्स भजन मंडळ स्थापन केले आहे. त्या भजनाला सुद्धा मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. त्याच्या या कलेला कलेला कुटुंबियांचा, मित्रांचा पाठिंबा आहे. यापुढे देखील नवीन गाणी काढण्याचा प्रयत्न असणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर गायन क्षेत्र हे खूप मोठं व्हावे व संगीत आपल्याला एक ऊर्जा देते त्यामुळे त्या कलेची सेवा करण्याचा मी प्रयत्न करत असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्याचबरोबर होळी रे होळी हे शिमगागीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल व जास्तीत जास्त प्रेक्षकांनी हे गाणे पहावे असे आवाहन अक्षयने केले आहे.
⭕ खाली युट्युब गाण्याची ????????▶▶️















