विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा’ सुरू

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा’ सुरू

विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा’ सुरू

अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी: राज्यभर विशेष सहाय्य विभागाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ‘जनकल्याण यात्रा 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून विभागाच्या विविध कल्याणकारी योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करण्यात येत आहे. जिल्ह्यातील या यात्रेचा शुभारंभ आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी मारुती बोरकर आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष सहाय्य विभागाच्या योजनांवर आधारित माहितीपट दिग्दर्शक व निर्माता शंकर बारवे यांनी तयार केला असून, मोबाईल एलईडी व्हॅनद्वारे तो दाखविण्यात येणार आहे. तसेच लाभार्थ्यांना योजनेची माहितीपत्रके देऊन योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

विशेष सहाय्य विभागाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना या सहा मुख्य योजना राज्य व केंद्र शासनाच्या मदतीने राबवल्या जात आहेत. लाभार्थ्यांना डीबीटी (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर) पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात आर्थिक मदत जमा केली जाते. त्यासाठी लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न असणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील 15 गावांमध्ये आणि शहरांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. योजनेच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या माहितीपटाद्वारे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, राज्य व केंद्र सरकार समाजातील गोरगरीब, वंचित, ज्येष्ठ, वृद्ध, विधवा आणि दिव्यांगांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे. लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयांत हेलपाटे मारावे लागू नयेत आणि त्यांना थेट मदत मिळावी, यासाठी डीबीटी पोर्टलद्वारे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. त्यामुळे भ्रष्टाचार व दिरंगाईला आळा बसला आहे.

राज्यातील गरजू, निराधार, वृद्ध आणि वंचितांना या योजनांचा लाभ मिळावा, यासाठी विशेष सहाय्य विभाग कार्यरत असून, जनकल्याण यात्रेच्या माध्यमातून योजनांचा व्यापक प्रसार केला जात आहे. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Comment

आणखी वाचा...

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : अमर हिंद मंडळ, दादर आयोजित कै....
Read More
कै. आबा पडते राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत तरुण कलावंतांची दमदार छाप

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन राजापूर - वार्ताहर...
Read More
20 मे रोजी अखिल भारतीय औषध दुकान बंद बाबत चे राजापूर पोलीस निरीक्षक, प्रांत, तहसीलदार यांना निवेदन

पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गुहागर -पंचायत समिती गुहागर शिक्षण विभाग यांचे मार्फत स्पर्धा परीक्षेमध्ये उज्वल यश संपादन...
Read More
पंचायत समिती गुहागर तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

*जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय - भंते सुमेध बोधी* आबलोली (संदेश कदम) बुद्ध धम्मा शिवाय या विश्वाला तरणोपाय नाही....
Read More
जीवनात यशस्वी होण्यासाठी मानवतावाद हाच उपाय – भंते सुमेध बोधी

‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

'माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार'; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा प्रसाद लाड यांच्या समितीसमोर सुनावणी पूर्ण;...
Read More
‘माफी मागणार नाही, हवी ती शिक्षा भोगायला तयार’; हक्कभंग समितीसमोर सुषमा अंधारेंचा आक्रमक पवित्रा

पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

पालकमंत्र्यांचा 'सज्जड दम' हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात! उदय सामंतांच्या सूचनेला वाटाण्याच्या अक्षता; ५० रुपये दर देण्याऐवजी...
Read More
पालकमंत्र्यांचा ‘सज्जड दम’ हवेतच; कॅनिंग कंपन्यांकडून आंबा खरेदी बंद, बागायतदार संकटात!

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा शिवारातील अर्धवट जळालेल्या...
Read More
बुलढाण्यात थरारक ऑनर किलिंग! चुलत भावाशी संबंधाच्या संशयातून पित्यानेच मुलीची केली निर्घृण हत्या

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न आबलोली (संदेश कदम) माजी सभापती स्वर्गीय वसंत उर्फ बाळासाहेब खेतले यांच्या पाचव्या...
Read More
गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे महाआरोग्य शिबिर उत्साहात संपन्न

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन    , रत्नागिरी, दिनांक:- ११ मे २०२६: ...
Read More
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. बाळासाहेब सावंत यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन 

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती आबलोली (संदेश कदम) राजापूर तालुक्यातील ओणी येथे श्री....
Read More
राजापूर तालुक्यातील ओणी येथील क्रिकेट स्पर्धेला क्रिकेटपट्टू सिद्धेश लाड यांची प्रमुख उपस्थिती

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न

श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न तवसाळ पंचक्रोशीत भक्तिभाव, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ढोलताशांच्या गजरात उत्सवाची सांगता  | तवसाळ,...
Read More
श्री महामाई सोनसाखळी देवीचा पालखी महोत्सव जल्लोषात संपन्न