जिच्या उदरातून,
जन्म घेते दुनिया सारी..
त्या विश्वशक्तीचे
नाव आहे नारी.. – अँड. सौ. कल्याणी किरण पाटील
नालासोपारा – संदीप शेमणकर
जागतिक महिला दिन ८ मार्च रोजी. साजरा केला जात आहे. समाजात महिलांबद्दल आदराची भावना निर्माण करणे आणि त्यांना पुरुषांप्रमाणे समान अधिकार मिळवून देणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.
महिला दिन महिलांच्या आत्मसन्मानाचा दिवस, महिलांची ध्येय संकल्प आणि उद्दीष्टांची मनोकामना करण्याचा दिवस. या दिवशी महिलांना एक आत्मप्रेरणा मिळते.
शिक्षण, विज्ञान, राजकारण, क्रीडा, कला, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात आज महिला आपल्या यशाची पताका फडकवत आहेत. या निमित्ताने आपण महिलांचा सन्मान करू आणि त्यांना समान हक्क आणि संधी देण्यासाठी काम करू, अशी शपथ घेतली पाहिजे. महिला या केवळ घरापुरत्या मर्यादित नसून त्या शिक्षिका, डॉक्टर, शास्त्रज्ञ, नेते आणि उद्योजकही आहेत. त्यांच्या क्षमता समजून घेऊन त्यांना साथ दिली पाहिजे कारण त्यांच्याशिवाय समाज अपूर्ण आहे. महिला सक्षमीकरण ही प्रगतीशील समाजाची ओळख आहे.
आज जर हा लेख तुमच्या पर्यत पाठवत आहे. ते सुद्धा एक सुशिक्षित समाज घडत आहे याच उदाहरण आहे.मी एक वकील असुन मला उच्च शिक्षणा चा अधिकार मिळाला. आणि मी माझ्या समाजा समोर माझे विचार पोहचवले मला अधिकार मिळाला आहे, म्हणजे मी आणि माझ्या सारख्या असंख्य महिला या महिला दिनाचे उत्तम उदाहरण आहोत.
जर आपण आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणाविषयी बोललो.तर महिलांना त्यांच्या हक्कांसाठी आधी स्वत:शीच लढावे लागेल. जेणेकरून त्या जगाशी लढताना बळकट होऊ शकतील. पहिला आणि सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे आत्मविश्वास वाढवून आत्मसन्मान मिळवणे. महिलांनी त्यांचे महत्त्व समजून घेऊन स्वत:ची काळजी घेऊन त्यांचा सन्मान वाढवला पाहिजे. आत्म-सन्मान विकसित करताना, आपल्या आंतरिक शक्तीला सकारात्मक विचारांनी सजवणे महत्वाचे आहे.जेव्हा महिलांना सशक्त आणि सन्माननीय वाटेल, तेव्हाच त्या समाजात त्यांची ओळख योग्य पद्धतीने प्रस्थापित करू शकतील.
समस्त महिला वर्गाला जागतीक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
अँड. सौ.कल्याणी किरण पाटील
अध्यक्ष –
चीमा पाटील शिक्षण संस्था.
किरण पाटील फाऊंडेशन.
नालासोपारा जिल्हा- पालघर