पनवेल ते बदलापूर बोगद्याच काम पूर्ण…

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

पनवेल ते बदलापूर ला जायला आता १५ मि. जाणे शक्य.

पनवेल – (वार्ताहर)- बदलापूर ते पनवेल या सुमारे सव्वाचार किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र हे काम या मुदतीआधीच पंधरा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण झाले आहे. वडोदरा जेएनपीटी महामार्गावरील हा एक महत्वाचा टप्पा असून या महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर बदलापूर ते पनवेल हे अंतर सुमारे दहा ते पंधरा मिनिटात पार करणे शक्य होणार आहे.

 

वडोदरा जेएनपीटी महामार्गाचे काम सध्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात सुरू आहे. बदलापूर ते पनवेल बोगदा हा या महामार्गातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी बदलापूरहून तब्बल सव्वाचार किलोमीटर लांबीचा बोगदा पनवेलपर्यंत तयार करण्यात आला आहे.

हा बोगदा २२ मीटर रुंद असून त्यात चार मार्गिका असणार आहेत. या बोगद्याला आतमध्ये काही ठिकाणी इंटरचेंज सुद्धा देण्यात आले आहेत. या बोगद्याच्या कामासाठी दोन वर्षांचा कालावधी अपेक्षित असताना प्रत्यक्षात अवघ्या पंधरा महिन्यातच बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे.

नवी मुंबई विमानतळाला ही जाता येईल..

हा महामार्ग सुरू झाल्यानंतर या बोगद्यामुळे बदलापूर ते पनवेल हा प्रवास अवघ्या १० ते १५ मिनिटात करणे शक्य होणार आहे. तर अटल सेतू मार्गे अवघ्या अर्धा ते पाऊण तासात मुंबई गाठणे शक्य होणार आहे. नवी मुंबई विमानतळाला सुद्धा कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]