महाराष्ट्र शासनाची ५०,००० योजना दुत …भरती…

महाराष्ट्र शासनाचा ..50 हजार “योजना दूत” भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू भरती साठी ऑनलाईन अर्ज सुरू.

Yojana Doot Bharti Form

महाराष्ट्र राज्य सरकारने होतकरू उमेदवारांसाठी एक मोठी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे. “योजना दूत भरती” योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विविध सरकारी योजना राज्यातील गोरगरीब नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी 50,000 योजना दूतांची भरती केली जाणार आहे.

नेमकी काय आहे “योजना दूत”..?

या भरती अंतर्गत भरती केलेल्या योजना दूतांना राज्य शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध सरकारी योजना त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम देण्यात येणार आहे. यासाठी योजना दूताना आपल्या गावातच काम मिळणार आहे त्यामुळे इतर गावात जायची गरज लागणार नाही.या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी प्राप्त होतील आणि त्यांना प्रति महिना 10,000 रुपये वेतन दिले जाईल.

मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राज्य सरकारने सुरु केला असून त्याअंतर्गत तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या योजनादूतांना सरकारच्या योजनांची माहिती सामान्य लोकांना देण्याची जबाबदारी असणार आहे. निवड झाल्यावर सहा महिन्यांसाठी यांना दरमहा १०,००० रुपये मानधन दिले जाईल. राज्यभरातून ५०,००० योजना दूतांची निवड केली जाईल आणि यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.

“योजना दूत” भरतीचा अर्ज कसा करायचा .

1. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. संबंधित लिंक खाली दिलेली आहे..

.अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा. संबंधित लिंक खाली दिलेली आहे.

2. नोंदणी करा: वेबसाइटवर नोंदणीसाठीचा फॉर्म भरा. आवश्यक माहिती, जसे की नाव, संपर्क तपशील, शैक्षणिक पात्रता इत्यादी माहिती भरावी.

3. माहिती व दस्तऐवज जमा करा: अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

निवड प्रक्रिया, निकष आणि फायदे:

– इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. अर्जासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे. अर्ज https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर करावा लागेल.

 

यासाठी कोण अर्ज करू शकते :-

– वयोमर्यादा: १८ ते ३५ वर्ष

– शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर

– संगणक ज्ञान आवश्यक

– अद्ययावत मोबाईल असावा

– महाराष्ट्राचा रहिवासी असावा

– आधार कार्ड आणि त्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.

Ratnagiri Vartahar
Author: Ratnagiri Vartahar

⭕ मुख्य संपादक - सुजेंद्र सुर्वे , रत्नागिरी वार्ताहर *डिजीटल मिडिया बातमी पत्र* ◀️ Digital Media Creator's ▶️

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें