बांगलादेशीय नागरिकाला रत्नागिरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीतून दिला गेला खोटा जन्म दाखला, ..!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

   बांगलादेशीय नागरिकाला रत्नागिरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीतून दिला गेला खोटा जन्म दाखला!!!

????दरम्यान या ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक फरार असल्याचे समजते.

चक्क बांगलादेशीय नागरिकाला रत्नागिरी तालुक्यातील एका ग्रामपंचायतीतून दिला गेला जन्म दाखला!!!

रत्नागिरी – वृत असे , मुंबई पोलिसांना एका गुन्ह्यात बांगलादेशीय आरोपी सापडला आणि पाळमुळं रत्नागिरी मधील शिरगांव ग्रामपंचायती पर्यंत येऊन ठेपल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी संबंधित तत्कालीन सरपंचासह, ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक यांना चौकशीसाठी बोलवल्याचे समज

 

याबाबत सविस्तर असे की रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायत मधून तत्कालीन सरपंचासह तेथील ग्रामपंचायतीतून एका बांगलादेशीय नागरिकाचा बनावट जन्म दाखला तयार करण्यात आला.

 

या बांगलादेशीय नागरिकाचा जन्म रत्नागिरी येथील उद्यम नगर येथील पडवेकर कॉलनी येथे झाल्याचे दाखवण्यात आले आणि एकच खळबळ उडाली आहे.

 

शिरगाव ग्रामपंचायतच्या तत्कालीन सरपंच यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं आहे.

 

 

दरम्यान बांगलादेशीय या नागरिकाला पोलिसांनी पकडलेले असून मुंबई पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.

 

2020 मध्ये तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,तसेच ग्रामसेवक यांची ही चौकशी मुंबई पोलिसांनी सुरु केलेली आहे.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी कोणतीही चौकशी करता त्या बांगलादेशी नागरिकाला भारता जन्म झाला असल्याचा दाखला दिलाने या प्रकरणात मुंबई पोलिसांनी लक्ष घातले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

 

दरम्यान या प्रकरणातील संबंधित लोकांची चौकशीही मुंबई पोलिसांनी सुरू केली आहे

 

मिळालेल्या माहितीनुसार कलम 179 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 अन्वये कलम 35 (तीन )भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 20 23 अन्वये

 

या कलमा द्वारे संबंधित लोकांना मुंबई पोलिसांकडून चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.

दरम्यान मुंबई पोलिसांनी एका गुन्ह्यातील336(2)337,338,339,340(2)319(2)3(5)भारतीय न्याय संहिता 2023सह नियम 3 पारपत्र भारतात प्रवेश अधि. 1920सह नियम 6पारपत्र भारतात प्रवेश अधि. नियम सह कलम 13,14,(अ )(ब )परकीय नागरिक अधिनियम 1946या गुन्ह्यात आरोपी मोहम्मद इद्रीस मोहम्मद इशाक शेख उर्फ नसीम वय 42 वर्षे नाव जोशीमुद्दीन बिशू देवान हा मूळ बांगलादेशीय नागरिक याला दिनांक 03/10/2024 रोजी नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.

 

शिरगांव ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग, जन्मप्रमाणपत्र दिनांक 04/03/2020रोजी बाळाचे नाव मोहम्मद ईद्रीस शेख, जन्म दिनांक 01/05/1983,जन्म ठिकाण उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी, आई वडिलांचा कायमचा पत्ता उद्यमनगर पडवेकर कॉलनी ता. जि. रत्नागिरी आई च नाव शाहिदा बेगम मोहम्मद इसाक शेख, वडील मोहम्मद इसाक शेख असा खोटा जन्म दाखला 04/03/2020रोजी बनवून देण्यास सहकार्य केल्याने शिरगाव ग्रामपंचायती चे तत्कालीन सरपंच, ग्रामपंचायत ग्रामसेवक व ज्यांनी शिफारस दिली ते ग्रामपंचायत सदस्य यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी बोलवलेले आहे.

 

 

 

 

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]