जैतापूरचा अभिमान! कु. प्रतिक्षा संदेश पाटीलची मुंबई पोलिस दलात निवड .

जैतापूरचा अभिमान! कु. प्रतिक्षा संदेश पाटीलची मुंबई पोलिस दलात निवड –

✍️ राजू सागवेकर | राजापूर

▪️राजापूर तालुक्यातील जैतापूर गावच्या कर्तृत्ववान कन्येने पुन्हा एकदा गावाचे नाव उज्ज्वल केले आहे! कै.संदेश गोवर्धन पाटील आणि आशासेविका सुप्रिया संदेश पाटील यांची सुपुत्री कु. प्रतिक्षा संदेश पाटील हिने आपल्या जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर मुंबई पोलिस आणि जेल पोलिस या दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळवले असून तिची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे.

▪️ तिने आपल्या उल्लेखनीय कामगिरीने पंचक्रोशीत मानाचा तुरा रोवला आहे. तिच्या कर्तृत्वामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिक, परिवार व मित्रपरिवाराने तिच्या यशाचा उत्साहाने गौरव करत हार्दिक अभिनंदन केले आहे.

जैतापूरचा अभिमान! कु. प्रतिक्षा संदेश पाटीलची मुंबई पोलिस दलात निवड –

▪️ तिच्या पुढील कारकीर्दीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत, ती एक कर्तव्यदक्ष आणि नावलौकिक अधिकारी बनो, अशी प्रार्थना करण्यात येत आहे. तिच्या भविष्यातील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून पाठिंबा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

जैतापूरचा अभिमान! कु. प्रतिक्षा संदेश पाटीलची मुंबई पोलिस दलात निवड –

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें