जैतापूर प्राथमिक शाळा शिक्षक संकट: पालक आक्रमक, आंदोलन तात्पुरते स्थगित

जैतापूर प्राथमिक शाळा शिक्षक संकट: पालक आक्रमक, आंदोलन तात्पुरते स्थगित

 

कायमस्वरूपी शिक्षक नियुक्तीच्या मागणीवर पालक ठाम; प्रशासनाला दिला अल्टीमेटम

✍️राजू सागवेकर/राजापूर 

 

▪️ जैतापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 1 (सेमी इंग्रजी) मध्ये शिक्षक अपुऱ्या संख्येने दिल्याने पालक आक्रमक झाले आहेत. अनेक महिन्यांपासून या शाळेत केवळ एकच पूर्णवेळ शिक्षक कार्यरत होता, तर सहाय्यक शिक्षक आलटून-पालटून बदलत होते. सततच्या मागणीनंतरही प्रशासनाने योग्य तो प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे पालकांनी 7 फेब्रुवारीपासून शाळा बंद आंदोलनाचा इशारा दिला होता.

 

शिक्षकांच्या कमतरतेमुळे शिक्षणावर परिणाम.

 

▪️ गेल्या महिनाभरापासून पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे शिक्षक पुरवण्यासाठी वारंवार विनंती करण्यात आली. पालक व शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा भेटी घेतल्या, मात्र आश्वासनांपलीकडे ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आणि 7 फेब्रुवारी रोजी शाळेच्या गेटबाहेर आंदोलन सुरू केले.

 

कामगिरीवरील शिक्षकाची नियुक्ती; आंदोलन तात्पुरते स्थगित

 

▪️ सकाळी 11 वाजेपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नव्हती. मात्र, ग्रामपंचायत सरपंच राजप्रसाद राऊत यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत परिस्थिती स्पष्ट केली. त्यानंतर प्रशासनाने तातडीने एक महिला शिक्षक कामगिरीवर पाठवली. त्या दुपारी 12 वाजता शाळेत दाखल झाल्याने पालकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.

 

कायमस्वरूपी शिक्षकांसाठी पालकांचा आग्रह

 

▪️ तथापि, पालक हे तात्पुरत्या उपायांवर समाधान मानण्याच्या मनःस्थितीत नाहीत. पालक व शाळा व्यवस्थापन समितीने प्रशासनाला इशारा दिला आहे की, सध्याचे शिक्षक शिक्षण पूर्ण वर्षभरासाठी शाळेत राहिले पाहिजेत आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून दोन कायमस्वरूपी शिक्षक नियुक्त करण्यात यावेत. अन्यथा पालक आपल्या मुलांसह पंचायत समितीवर धडक देणार असल्याचे ठामपणे सांगण्यात आले आहे.

 

प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

 

▪️ शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ आता प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लक्ष ठेवून आहेत. कायमस्वरूपी शिक्षकांच्या नियुक्तीसाठी योग्य तो निर्णय न घेतल्यास पुन्हा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा पालकांनी दिला आहे.

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें