हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचा एल्गार: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘शासन निर्णयाची होळी’

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

हिंदी सक्तीविरोधात शिवसेनेचा एल्गार: उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘शासन निर्णयाची होळी’

मराठी भाषेच्या अस्मितेसाठी शिवसेना कायमच ठाम

मुंबई: मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘अन्याय्य शासन निर्णयाच्या प्रतीकात्मक होळी’ कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्यजी ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी हिंदी सक्तीच्या वादग्रस्त शासन निर्णयाची प्रतीकात्मक होळी करण्यात आली, ज्यामुळे मराठी भाषेच्या सन्मानासाठी शिवसेनेची कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
यावेळी, उपस्थितांनी ‘आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, हिंदी सक्तीला विरोध आहे,’ ही भूमिका एकमुखाने मांडली. हिंदी भाषेच्या सक्तीमुळे मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा येत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
शिवसेनेने स्पष्ट केले आहे की, मराठी भाषेच्या अस्मितेवर गदा आणणाऱ्या कोणत्याही निर्णयाविरोधात शिवसेना कायमच ठामपणे उभी राहील. हा कार्यक्रम मराठी भाषेशी संबंधित विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा एक प्रयत्न होता.

 

#मराठी #मराठीअस्मिता #हिंदीसक्ती #उद्धवठाकरे #आदित्यठाकरे #शिवसेना #मराठीभाषा #महाराष्ट्र #शासननिर्णय #मराठीबातम्या

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]