शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शौचालय घोटाळा – तक्रारदाराला 3 वर्षांपासूनही न्याय नाही!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच शौचालय घोटाळा – तक्रारदाराला 3 वर्षांपासूनही न्याय नाही!

 

 रत्नागिरी (प्रतिनिधी):निलेश रहाटे

शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रुप वाटद मिरवणे ग्रामपंचायत मध्ये सन २०१४-१९ मध्ये स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मोठ्या प्रमाणात शौचालय अनुदानात भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर प्रकार RTI द्वारे समोर आला होता. या घोटाळ्याबाबत दिनांक 30 जून 2022 पासून सुरू असलेला संघर्ष आता तब्बल 3 वर्षांचा टप्पा आज पूर्ण केला आहे तरी पण आजूनही तक्रारदाराला न्याय मिळालेला नाही.व भ्रष्टाचार करणाऱ्या वर ठोस कारवाई नाही.

 

तक्रारदाराने संबंधित अधिकाऱ्यांना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गटविकास अधिकारी, CEO, विभागीय आयुक्त, मंत्रालय, आमदार पालकमंत्री हयांच्या कार्यालय मध्ये लेखी स्वरूपात तक्रारी सातत्याने पुरावे देऊन केल्या आहेत. त्यामध्ये सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक,शिपाई, हयांच्या बायका च्या नावानी सौचालय लाभ घेतलेली बिल लाभार्थी म्हणून आहेत, डबल बिल, खाडाखोड झालेली 20 बिल , फक्त लाभार्थी चे बँक अकाउंट नंबर घेऊन पैसे सोडलेले आहेत… संबंधित लागणारे कागदपत्र जमा केलीली नाहीत आणि स्वीय नातेवाइकांच्या नावाने लाभ घेतल्याचे ठोस पुरावे असताना देखील कारवाई होत नसल्यामुळे तक्रारदार व ग्रामस्थ हयांना प्रश्न उपस्थित होतोय — “दोषींना राजकीय संरक्षण आहे का?” की संबंधित जिल्हा परिषद रत्नागिरी व पंचायत समिती रत्नागिरी मधील अधिकारी वर राजकीय दबाव आहे का ? जिल्हा परिषद व पंचायत समिती रत्नागिरी ही कार्यालय भ्रष्टाचारी चालवत आहेत का ? असे असंख्य प्रश्न तक्रारदार व गावाला पडले आहेत.

???? तक्रारदाराचे म्हणणे:

“मी तीन वर्षांपासून या लढ्यात आहे.आ. उपोषण, अर्धनग्न उपोषण झाली व माझ्याकडे सर्व पुरावे असूनही कोणतीही ठोस कारवाई अद्याप ही झाली नाही. ग्रामसेवक कडून ही रक्कम घोटाळा ची 4,77,400/- रु हे मी दाखवून दिल्यावर तब्बल दहा वर्षांनी वसुली चालू होत आहे ती सुद्धा तक्रार केल्यावर १८ महिन्यानी व १८ महिन्यासाठी तरी सुद्धा ग्रामसेवक वर कुठची ही कारवाई नाही ह्या मध्ये झालेली अनियमितता ही संबंधित पंचायत समितीला १० वर्षात समजली नाही का ? गटविकास अधिकारी यांनी भ्रामक अहवाल बनवू वरिष्ठ कार्यालय व अधिकार्‍यांची दिशाभूल आजपर्यंत करत आले आहेत.त.बॉडी मधील काहीजन आता शिवसेना चे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत असे समजते. तरी सत्ताधाऱ्यांच्या बालेकिल्ल्यात सामान्य माणसाला न्याय मिळण्यासाठी आजून किती वर्ष असाच संघर्ष करत रहावा लागेल?

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आणखी वाचा...

[recent_post_slider design="design-1"]