रत्नागिरीत शेतकऱ्यांना रोपवाटिकांचे वितरण ,शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट, व जिजाऊ संस्था यांचा पुढाकार

रत्नागिरीत शेतकऱ्यांना रोपवाटिकांचे वितरण ,शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट, व जिजाऊ संस्था यांचा पुढाकार.

 

शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट, व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा पुढाकार 

रत्नागिरी – संदीप शेमणकर

कोकणचे सुपत्र, कुणबी नेते कै.

शामराव पेजे स्मृति न्यास ट्रस्ट आणि जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था यांच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक लोकोपयोगी उपक्रम वेळोवेळी राबवले जातात.त्याचाच एक भाग रविवार दिनांक २९ जून २०२५ रोजी खालगाव येथे पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज ओळखून हॉटेल कोकण गारवा येथील हॉलमध्ये खालगाव-जाकादेवी पंचक्रोशीतील तरवळ,पोचरी,कोंड्ये,चवे,परचुरी उपळे,मेढे,फुणगुस,उक्षी,देण,राईआगरनरळ,चाफे,विल्ये,मांजरे,ओरी,खालगाव,देवूड,बोंड्ये(नारशिंगे) अशा १९ गावातील सुमारे दीडशेहून अधिक शेतकऱ्यांना रक्तचंदनाची झाडे वितरीत करण्यात आली. व दोन्ही संस्थांच्या वतीने ‘झाडे लावा,झाडे जगवा’ हा संदेश देण्यात आला.

या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर शामराव पेजे स्मृति न्यासचे अध्यक्ष सुजित झिमण, श्री.अनिल नवगणे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई अध्यक्ष अनिल नवगणे, ट्रस्टी शामराव पेजे ट्रस्ट हरिश्चंद्र गीते, खजिनदार गजानन चाळके, खजिनदार विवेक सावंत, कृषी तज्ञ डॉ. नागवेकर त्याचबरोबर जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व शामराव पेजे न्यासाचे सदस्य ॲड.महेंद्र मांडवकर,सचिन गोताड,अनिकेत पाटील, साहिल रेवाळे, राज फुटक त्याचबरोबर खालगाव पंचक्रोशीतील इतर मान्यवर उपस्थित होते.

सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यामध्ये त्यांनी मोठयाप्रमाणात होणारी वृक्षतोड थांबवण्यासाठी शेतकऱ्यांना आव्हान केले. व जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्यास सांगितले. तसेच “रक्तचंदन” झाडाचे महत्व समजावून सांगताना डॉ.नागवेकर(कृषी तज्ञ) यांनी विविध झाडांबद्दल थोडक्यात तज्ञ मार्गदर्शन केले.

शेवटी सर्व शेतकऱ्यांना रक्त चंदनाच्या झाडांचे वाटप करण्यात आले. व उपस्थित सर्व मान्यवर व शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें