मराठी अभिनेत्याची मराठीशी प्रामाणिक हाक: “मुंबईत मराठीची वाट लागली आहे!” – वैभव मांगले

???? मराठी अभिनेत्याची मराठीशी प्रामाणिक हाक: “मुंबईत मराठीची वाट लागली आहे!” – वैभव मांगले

???? मातृभाषेची उपेक्षा आणि हिंदी सक्तीवर अभिनेता वैभव मांगले यांची परखड प्रतिक्रिया

???? “मराठी माणसालाच मराठी बोलायला लाज वाटते” — मुलंही विसरत आहेत शुद्ध मराठी, असा टोलाही

मुंबई :

“उर्वरित महाराष्ट्राबद्दल मला माहीत नाही, पण मुंबईत मात्र मराठी भाषेची अक्षरशः वाट लागली आहे” — अशा शब्दांत प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांनी मराठी भाषेच्या सध्याच्या स्थितीवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. मातृभाषेच्या प्रश्नावर त्यांनी थेट आणि प्रांजळ भूमिका मांडत संपूर्ण महाराष्ट्राच्या मराठीप्रेमी नागरिकांना जागं करण्याचा प्रयत्न केला आहे.

 

कामाच्या ठिकाणी मराठी माणसालाच सतत हिंदी आणि इंग्रजी भाषेचा वापर करावा लागतो, हे स्पष्ट करताना मांगले म्हणतात, “आपल्यातल्याच माणसांना मराठी बोलायची लाज वाटते आणि आपल्या मुलांनी चांगलं मराठी बोलणं तर जवळपास विसरूनच टाकलं आहे.”

 

त्यांना चिंता आहे की, जर असं सुरूच राहिलं आणि हिंदीची सक्ती झाली, तर मराठी भाषेचं अस्तित्व धोक्यात येईल. “आई जर मराठी बोलणारी असेल तरच मुलाचं भलं होईल, नाहीतर मातृभाषेची ‘भिकारणी’ होईल,” असा कडवट इशाराही त्यांनी दिला आहे.

 

वैभव मांगले यांच्या या स्पष्ट आणि ठाम भूमिकेचा समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद उमटत आहे. अनेक मराठी भाषाप्रेमींनी त्यांच्या या मताशी सहमती दर्शवली आहे आणि मुलांमध्ये पुन्हा एकदा शुद्ध, अभिमानास्पद मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्याची गरज अधोरेखित केली आहे.

 

 

 

#वैभवमांगले #मराठीभाषा #मुंबईतीलमराठी #मराठीअस्मिता #हिंदीसक्ती #आईमराठी #मराठीमुलं #भाषेचीलाज #मराठीप्रेम #मातृभाषा

 

???? फोटो

✍️ रत्नागिरी वार्ताहर

 

 

Sujit Surve.
Author: Sujit Surve.

⭕ सुजित सुर्वे -प्रतिनिधी - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र ⭕ ⭕ पडवे - गुहागर. 415613 ⭕

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें