शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा

*शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा*

“‘खेळ जगा व खेळ जगवा’चा विद्यार्थ्यांनी दिला नारा”

चिपळूण (संदेश कदम)

शरदचंद्रजी पवार कृषि महाविद्यालय, खरवते-दहिवली तालुका चिपळूण येथे भारताचे महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी विविध क्रीडा उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ‘खेळ जगा व खेळ जगवा’ असा प्रेरणादायी नारा दिला.

या कार्यक्रमास सह्याद्रि शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्राचे महत्त्व, नियमित व्यायामाची गरज तसेच शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी खेळांची भूमिका याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, निर्णयक्षमता आणि संघर्ष करण्याची वृत्ती विकसित होते, असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार शेखरजी निकम यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रालाही समान महत्त्व द्यावे, असे आवाहन केले. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमध्ये शारीरिक तंदुरुस्ती अत्यंत आवश्यक असून, नियमित खेळामुळे शरीरासोबत मनही प्रसन्न आणि सकारात्मक राहते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी आपल्यातील क्रीडागुण ओळखून त्यांना योग्य व्यासपीठावर विकसित करावे, असेही त्यांनी सांगितले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाबरोबरच क्रीडा उपक्रमांना महाविद्यालयात विशेष प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. खेळामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सकारात्मक दिशा मिळते. ‘खेळ जगा व खेळ जगवा’ हा संदेश केवळ क्रीडा दिवसापुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले. विविध क्रीडा उपक्रमांचे नियोजन व आयोजन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. क्रीडा निर्देशक सुहास आडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभागाने कार्यक्रमाचे नियोजन केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला.

राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी खेळाच्या माध्यमातून आरोग्य, शिस्त, संघभावना आणि सकारात्मक जीवनशैलीचा संदेश दिला.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें