पाचेरी सडा नं. १ शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग कामगिरी; अर्णव आणि मानवी जिल्हा गुणवत्ता यादीत

पाचेरी सडा नं. १ शाळेची शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग कामगिरी; अर्णव आणि मानवी जिल्हा गुणवत्ता यादीत

इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत दोन विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; पंचायत समिती गुहागर येथे गुणवंतांचा सत्कार

गुहागर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेच्या अंतिम गुणवत्ता यादीत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाचेरी सडा क्र. १ च्या दोन विद्यार्थ्यांनी स्थान मिळवत शाळेच्या तसेच पाचेरी सडा परिसराच्या शैक्षणिक लौकिकात भर घातली आहे.

कु. अर्णव आनंद काजरोळकर आणि कु. मानवी अजित पंडये यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा पंचायत समिती गुहागर येथे सभापती श्री. प्रणवजी पोळेकर आणि उपसभापती श्री. निलेशजी सुर्वे यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. यावेळी गटविकासाधिकारी श्री. शिंदे, गटशिक्षणाधिकारी श्री. गळवे तसेच पाचेरी आगर केंद्राचे माजी केंद्रप्रमुख श्री. विश्वास खर्डे सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या यशामध्ये त्यांचे वर्गशिक्षक तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. संजय रामप्रसाद वाघ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सहकारी शिक्षक श्री. सचिन लबडे, श्रीमती कीर्ती रुईकर आणि श्री. आनंद मुळे यांचेही मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळाले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल मुख्याध्यापकांनी सर्व सहकारी शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

अर्णव आणि मानवी यांच्या यशामुळे पाचेरी सडा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांकडून दोन्ही गुणवंत विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.

शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे मोलाचे सहकार्य यामुळे विद्यार्थ्यांना हे यश मिळाले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें