भातगाव-गोळेवाडीत गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लोकार्पण; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

भातगाव-गोळेवाडीत गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

 

ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत लोकार्पण; ग्रामस्थांची मोठी उपस्थिती

 

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील भातगाव-गोळेवाडी येथे गणपती विसर्जन तलावाचा लोकार्पण सोहळा मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत उत्साहात व जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, बँजो पार्टी आणि फटाक्यांच्या आतषबाजीत झालेल्या या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, पंचायत समिती सदस्या सौ. सुचिता घाणेकर-गोताड, सरपंच रेणुका आग्रे यांच्यासह विजय मोहिते, सागर काजरोळकर, विशाल गोताड, दीपक जाधव, आशिष डिंगणकर, अनंत डिंगणकर आदी मान्यवरांचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

 

मान्यवरांना ढोल-ताशांच्या आणि बँजो पार्टीच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत गणपती विसर्जन तलावाच्या लोकार्पण स्थळी नेण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर यांच्या हस्ते फित कापून, तर गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून गणपती विसर्जन तलावाचे लोकार्पण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाला भातगाव-गोळेवाडीतील अनंत आग्रे, महादेव आग्रे, अनंत दामोदर आग्रे, मनोहर आग्रे, गोपीनाथ गावडे, गंगाराम आग्रे, शंकर आग्रे, नामदेव आग्रे, शंकर गावडे, बाळू डिंगणकर, मालू सोलकर, रघुनाथ गावडे, रवींद्र गावडे, लक्ष्मण आग्रे, दिलीप मते, शंकर डिंगणकर, कृष्णा सोलकर, जानू सोलकर, कृष्णा आग्रे, दामोदर आग्रे, माजी सरपंच रवी पवार, संतोष आग्रे, मुरली आग्रे, सिद्धोधन मोहिते आदी ग्रामस्थांसह महिला-पुरुष कार्यकर्ते, गावकरी, मानकरी आणि जागामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर, उपसभापती निलेश सुर्वे आणि माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

 

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक डिंगणकर यांनी केले, तर अनंत गावडे गुरुजी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

2
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

माहिती अधिकार दिनानिमित्त लांजा तालुक्यात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे प्रशासनाला निवेदन; शाळा-महाविद्यालयांत प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध स्पर्धांसह विविध उपक्रम घेण्याची मागणी

Horoscope

Weather

और पढ़ें

माहिती अधिकार दिनानिमित्त लांजा तालुक्यात जनजागृती मोहीम राबवण्याची मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे प्रशासनाला निवेदन; शाळा-महाविद्यालयांत प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, निबंध स्पर्धांसह विविध उपक्रम घेण्याची मागणी

राज्य

शहर चुनें