सुरेशदादा सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड

*सुरेशदादा सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड

*डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाला यश

*पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत यांचा विशेष पुढाकार

*गुहागरच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण

आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे बौद्धजन सहकारी संघ (रजि.), तालुका गुहागरचे विद्यमान अध्यक्ष, जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण ( दिशा ) समिती, जिल्हा रत्नागिरी चे सदस्य सुरेशदादा भिकाजी सावंत यांची रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी दुसऱ्यांदा निवड करण्यात आली. दिनांक ३ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी येथे ही निवड प्रक्रिया पार पडली. या निवडीमुळे गुहागर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक झाली होती. संचालक मंडळाची स्थापना झाल्यापासूनच सभापतीपदासाठी सुरेशदादा सावंत यांच्या नावाला डॉ. चोरगे यांनी पसंती दर्शविली होती. त्यानुसार सुरेशदादा सावंत यांची सभापतीपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत आणि राजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण उर्फ भैय्या सामंत यांनीही विशेष पुढाकार घेतल्याचे समजते. ज्येष्ठ संचालक अरविंद गोविंद आंब्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली. निवडणूक अधिकारी म्हणून साहेबराव पाटील यांनी काम पाहिले.

गुहागर तालुक्यातील सहकार क्षेत्रात सक्रिय असलेल्या सुरेशदादा सावंत यांच्यावर आता दुसऱ्यांदा जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या अनुभवाचा बाजार समितीच्या कामकाजाला नक्कीच फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. सावंत यांच्या सभापतीपदी झालेल्या निवडीबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें