आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते काजुर्ली प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते काजुर्ली प्रशालेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव!

 

गुहागर, (वार्ताहर) : पंचायत समिती गुहागर येथे आयोजित आमसभेमध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार श्री. भास्करशेठ जाधव यांच्या शुभहस्ते शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

 

यामध्ये कै. डॉ. दिलीप मुरारी उर्फ नानासाहेब मयेकर माध्यमिक विद्यालय, काजुर्ली या प्रशालेतील इयत्ता सातवीची विद्यार्थिनी कु. सानवी सत्यवान राणे आणि इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु. तनया प्रवीण मोहिते यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

 

दोन्ही विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत मिळवलेल्या यशामुळे प्रशालेच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थिनींच्या या यशामागे शिक्षकांचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि विद्यार्थिनींची मेहनत महत्त्वपूर्ण ठरली.

 

या यशाबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. आशिष घाग यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका श्रीमती परविन तडवी, सौ. वर्षा पवार, सौ. पल्लवी महाडिक व श्रीमती वैष्णवी पावरी यांचेही कौतुक केले.

 

या गौरवामुळे विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी नवी प्रेरणा मिळाली असून प्रशालेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें