मेनलीप आणि कव्हर लीप तुटल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कुडली चिपळूण गुहागर गाडीचा अपघात घडला

*मेनलीप आणि कव्हर लीप तुटल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कुडली चिपळूण गुहागर गाडीचा अपघात घडला

आबलोली (संदेश कदम)

कुडली चिपळूण गुहागर एसटी गाडीला गुहागर तालुक्यातील शीर आंबेकर वाडी धारेवरची वाडी जवळ अपघात घडला. नशीब बलवतर म्हणून एसटीतील प्रवासी बालम बाल बचावले या एसटीत कुडली पडवे आणि गुहागर येथील प्रवासी प्रवास करत होते. ही एसटी कुडली येथून वस्तीवरून आबलोली मार्गे शृंगारतळी मार्गे चिपळूणला जात असताना शीर येथे आंबेकर वाडी, धारेवरची वाडी जवळ गाडीचे मेनलीप आणि कवर लीप तुटल्याने व गाडीवरील नियंत्रण सुटल्यानेच हा अपघात आज सकाळी सात वाजता घडला आहे. या गाडीतून पडवे येथील तायरा जांभारकर, कुडली येथील अमृता वासावे यांना जास्त दुखापत झाली तर भाग्यश्री हरचकर, प्रतिभा हरचकर, दर्शना पावरी, साधना पवार राहणार कुडली, सुभाष राठोड, गणेश दोडके राहणार गुहागर, सुनिता सुर्वे शिवणे यांना किरकोळ दुखापत झाली. गुहागर डेपोची एम एच 14 त 2765 ही एसटी गाडी ड्रायव्हर जी. पी.दोडके चालवत होते. या अपघाताचा एसटी महामंडळाच्या वतीने अपघात स्थळी एटीएस सुनील पवार, एडब्ल्यूएस मंदार कदम आणि आणि टीमने पंचनामा केला असून गाडीचा मेन लीप आणि कव्हर लीप तुटल्यानेच आणि ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. सर्व जखमींवरती प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली येथे डॉक्टर प्रशिक पांडे, डॉक्टर तेजल मोहिते यांच्या अधिपत्याखाली उपचार होऊन सर्व जखमींना घरी पाठवण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

4
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें