*गुहागरात सद्या मंद बुद्धीचे लोक उदयाला यायला लागलेत!
*चांगली काम उद्ध्वस्त करण्याची परंपरा असणारे गुहागरचा काय विकास करणार ? – आमदार भास्कर जाधव यांची जोरदार टीका
आबलोली (संदेश कदम)
गुहागरचे आक्रमक आमदार भास्कर जाधव यांनी पुन्हा एकदा आपल्या खास शैलीत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला आहे. गुहागरमधील आयोजित आमसभा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव यांनी नाव न घेता स्थानिक विरोधकांवर अत्यंत बोचरी आणि खालच्या शब्दांत टीका केली आहे. गुहागरमध्ये सध्या मंदबुद्धीचे लोक उदयाला यायला लागले आहेत, असा थेट टोला त्यांनी लगावला. इतकंच नाही तर, भाजप नेते आशिष शेलार यांच्यासोबत मुंबईत झालेल्या एका कथित बैठकीचा दाखला देत जाधव यांनी विरोधकांच्या विकासकामांच्या ज्ञानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे..
दुसऱ्याने केलेलं चांगलं काम उद्ध्वस्त करण्याची ज्यांची परंपरा आहे, ते या तालुक्याचा काय विकास करणार? असा सवाल करत भास्कर जाधव यांनी विरोधकांवर अत्यंत शेलक्या शब्दांत प्रहार केला आहे .











